बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अनन्या पांडे होणार मावशी, बहिणीने व्हिडीओ शेअर करत दिली गुडन्यूज

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 28, 2024 | 3:12 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ananya Panday Sister Pregnant

अनन्या पांडे होणार मावशी, बहिणीने व्हिडीओ शेअर करत दिली गुडन्यूज

गेल्या वर्षी म्हणजेच २०२३मध्ये लग्न झालेल्या अलाना पांडे व आयव्हर मॅकक्रे यांनी चाहत्यांसह एक गुडन्यूज शेअर केली आहे. लवकरच दोघे आई-बाबा होणार आहेत. म्हणजेच अभिनेत्री अनन्या पांडे मावशी होणार आहे. अनन्याच्या बहिणीने अलानाने इंस्टाग्रामवर तिच्या मॅटर्निटी शूटचा व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये अलाना व आयव्हर पोज देताना दिसले आहेत. दोघांनी बेबी बंपसह क्यूट पोज दिल्या आहेत. व्हिडीओमध्ये हे जोडपे एकमेकांकडे पाहून हसतानाही दिसत आहे. अलानाने तिच्या सोनोग्रामची झलकही दाखवली आहे. या व्हिडीओमध्ये, अलानाने फ्लोरल स्ट्रिंग ड्रेस घातला होता तर आयव्हर पांढरा शर्ट व ट्राउझर्समध्ये खूप उठून दिसत होता. (Ananya Panday Sister Pregnant)

हा व्हिडीओ शेअर करत अलानाने लिहिले की, “आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. आम्ही तुला भेटण्यासाठी थांबू शकत नाही”, या पोस्टला उत्तर देत तिच्या नवऱ्याने लिहिले, “मी माझ्या बाळाला भेटण्यासाठी थांबू शकत नाही, मी तुझ्यावर प्रेम करतो”, असं म्हटलं. अनुषा दांडेकर व तानिया श्रॉफ यांनी या जोडप्याचे अभिनंदन केले.

आणखी वाचा – अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधी बांधली १४ मंदिरं, भव्यता पाहून तुम्ही चक्रावाल

View this post on Instagram

A post shared by Alanna Panday (@alannapanday)

भावना पांडेने यावर कमेंट केली आहे की, “अलाना आम्ही खूप प्रतीक्षा करु शकत नाही. खूप प्रेम व शुभेच्छा”. तर अलानाची आई, डीन पांडे म्हणाली, “तुझा व्हिडीओ पाहून भावुक झाले आहे. मी आजी होणार आहे, तू माझ्या बाळा खूप सुंदर दिसत आहे. तुला पाहण्यासाठी थांबू शकत नाही. मी लवकरच आजी होणार आहे”, असं म्हणत तिने आनंद व्यक्त केला आहे.

आणखी वाचा – मिलिंद गुणाजींचा अमिताभ बच्चनसह काम करण्यास नकार अन्…; अभिनेत्याने खुलासा करत सांगितलं होतं नेमकं काय घडलं होतं?

अलाना ही चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडे व फिटनेस ट्रेनर डीन पांडे यांची मुलगी आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये मुंबईत हिंदू रितीरिवाजांनुसार त्यांनी लग्न केले. लग्नाला अलानाची चुलत बहीण अनन्या पांडे, चंकी तसेच रेखा, शाहरुख खान, जॅकी श्रॉफ, बॉबी देओल, नीलम कोठारी, महिमा चौधरी, तुषार कपूर यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.अलानाने २०२१ मध्ये तिचा बॉयफ्रेंड आयव्हरशी लग्न केले. आयव्हर हा व्यवसायाने यूएस स्थित फोटोग्राफर आहे. लग्न करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी अलाना व आयव्हर यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केले. त्याचे युट्युब चॅनल असून तो लॉस एंजेलिस, यूएसए येथे राहतो. इन्स्टाग्रामवर त्याचे मोठ्या संख्येने फॉलोअर्सही आहेत.

Tags: alanna panday pregnancyananya pandayAnanya Panday SisterAnanya Panday Sister Pregnant
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Maharashtrachi hasyajtra fame shyam Rajput talked about his struggle in film industry

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील श्याम राजपूत यांचे शिक्षण किती?, पाहिल्यांदाच सांगितले सत्य, म्हणाले, “माझ्या आईने...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.