शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“निसर्गसौंदर्याशी तडजोड करुन…”, केतकी माटेगांवकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना विनंती करत म्हणाली, “यावर आपण मिळून… ”  

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 24, 2024 | 10:51 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ketaki Mategaonkar appealed PM narendra modi and CM eknath shinde about nature and development by sharing a post

“निसर्गसौंदर्याशी तडजोड करुन...”, केतकी माटेगांवकरची ‘ती पोस्ट चर्चेत, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना विनंती करत म्हणाली, “यावर आपण मिळून... ”

पर्यावरण आणि विकास या मुद्द्यांवर जेव्हा चर्चा होते, तेव्हा या दोन्ही मुद्दे कायमच एकमेकांच्या विरोधातच उभे केले जाते. विकास हवा तर पर्यावरणाची हानी होईल आणि पर्यावरण वाचविण्याची भूमिका घेतली, तर विकास खुंटेल, असा एक बागुलबोवा उभा केला जातो. यावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे भाष्य केले आहे आणि ही मराठमोळी अभिनेत्री म्हणजे केतकी माटेगावकर.

‘टाईमपास’ या लोकप्रिय चित्रपटातून आणि आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करणारी अभिनेत्री केतकी माटेगांवकर ही सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्गही आहे. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व गाण्याचे व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

View this post on Instagram

A post shared by Ketaki Mategaonkar (@ketakimategaonkar)

केतकीने तिचा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, “हा फोटो! या फोटोमध्ये तुम्हाला काय दिसत आहे? निसर्ग सौंदर्य. जेव्हा मी विकास पाहते, तेव्हा मला फार अभिमान वाटतो. पण निसर्ग सौंदर्याशी तडजोड करून विकास झाला तर? मग मला माझे हृदय तुटल्यासारखे वाटते. मी स्वतः टॉवरमध्ये राहते. पण जेव्हा मी खिडकीतून बाहेर पाहतो तेव्हा मला झाडे दिसत नाहीत, दिसतं ते फक्त काँक्रीटचे जंगल आणि तेव्हा मला खूप अपराधी वाटतं”.

आणखी वाचा – मराठी ‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर शिव ठाकरेला २५ लाखपैकी फक्त इतकेच पैसे मिळाले, स्वत:च खुलासा करत म्हणाला, “आई-वडिलांच्या तिकीटाचे…”

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “यावर आपण मिळून काही करू शकतो का? उद्या जर मुलं आम्हाला कंटाळा आला आहे असं म्हणाले तर पालक त्यांना कुठे घेऊन जाणार? मॉल्स? की आर्केड? आपल्या सर्वांना तिथे जायला आवडते. पण ते त्यातच सर्व आलं का? आपण ज्या पंचतत्वांनी बनलो आहोत त्या पंचतत्वांशी ते जोडू शकतात का?”

आणखी वाचा – आजचे राशी भविष्य : होलिका दहनाची तिथी मेष ते मीन राशीला कशी जाणार? कुणासाठी आजचा दिवस असणार अगदी खास? जाणून घ्या…

यापुढे तिने आपला देश छान हिरवागार असावा एवढंच माझं स्वप्न आहे आणि जेव्हा आपण म्हणतो की, भारत ही पुढची महासत्ता असेल, तेव्हा भारताला नैसर्गिकदृष्ट्या सक्षम केले पाहिजे. भारत एक कृषीप्रधान देश आहे. सर्वात हिरवागार देश आहे” असं म्हणत तिने तिच्या चाहत्यांना “मी माझे काम करत आहे. मी आता पुढाकार घेत आहे. तुम्हीही कराल?” असं आवाहनही केले आहे. तसेच या पोस्टमध्ये तिने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, अभिनेते सयाजी शिंदे यांचाही उल्लेख केला आहे.

Tags: ketaki mategaonkarmarathi entertainment newsMarathi news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Priya Bapat shared an incident where a person misbehaved with her see the details

“एक माणूस समोरून आला अन्...”, प्रिया बापटने सांगितला तिच्याबरोबर घडलेला ‘तो’ धक्कादायक प्रकार, म्हणाली, “तेव्हापासून माझ्या मनात...”  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.