आज २४ मार्च २०२४, रविवार. आज आज सकाळी ९.५३ पर्यंत चतुर्दशी तिथी पुन्हा पौर्णिमा तिथी असेल. तसेच आज सकाळी ७.३४ पर्यंत पूर्वा फाल्गुनी नक्षत्र राहील आणि नंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र राहील. दुपारी ०४.३० ते ०६. ०० पर्यंत राहुकाल राहील. कोणत्या राशीच्या लोकांसाठीआजचा होळीचा दिवस कसा असेल? चला जाणून घेऊया…
मेष : व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय किंवा योजना घेताना तज्ज्ञ आणि वडीलधाऱ्यांचा सल्ला अवश्य घ्या, त्यांचा सल्ला उपयोगी ठरेल. कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. म्ही तुमच्या आवडीचा कोणताही व्यवसाय सुरू करू शकता. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करताना तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींकडेही लक्ष द्यावे.
वृषभ : आजचा दिवस आर्थिक दृष्टिकोनातून चांगला आहे. तुम्हाला व्यवसायात नफ्याची संधी मिळेल. संधी ओळखून तिचा लाभ घ्या. आर्थिक फायदा होईल. त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबाकडे लक्ष द्याल. कुटुंबातल्या सदस्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण कराल. तुमच्या आरोग्याबाबत जागरुक राहणे आवश्यक आहे.
मिथुन : व्यवसायासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आनंदात व्यत्यय आल्याने अस्वस्थता वाटेल. अचानक एखादी निराशाजनक बातमी समजेल. बातमी समजल्यावर प्रवास करावा लागू शकतो. कुटुंबातले सदस्य एकमेकांशी संवाद साधणार नाहीत. त्यामुळे कौटुंबिक वातावरण शांततापूर्ण असेल. यामुळे घरातले ज्येष्ठ सदस्य निराश होतील.
कर्क : व्यवसायात प्रलंबित असलेले प्रकल्प पूर्ण होतील. वेळ प्रतिकूल असेल आणि त्यामुळे खर्चही वाढू शकतो. कुटुंबातील वृद्ध व्यक्तींना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. , त्यांची काळजी घेणे तुमचे कर्तव्य आहे. प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल. ही कामं पूर्ण झाल्यावर इतर कामाचा विचार कराल.
सिंह : व्यापारी वर्गाबद्दल सांगायचे तर, तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करू शकता. तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर वेळ तुमच्या अनुकूल आहे. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनात शांतता आणि सौहार्द वाढेल. तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
कन्या : आज कामाच्या ठिकाणी काही सुखद घटना घडू शकतात. राजकीय क्षेत्रातील उच्चभ्रू लोकांशी तुमची भेट होईल. त्यांचे मार्गदर्शन व सहवास मिळेल. व्यवसायात चढ-उतार होतील. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. अन्यथा फसवणूक होऊ शकते.
तूळ : दिवस मध्यम फलदायी असेल. तुमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा वाढेल. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या आवडीचं काम मिळेल. त्यामुळे ते आनंदी असतील; पण त्यांनी त्यांच्या कनिष्ठ सहकाऱ्यांसोबत गैरवर्तन टाळावं. वैवाहिक जीवनात चढ-उतार येऊ शकतात.
वृश्चिक : आजचा दिवस फलदायी असेल. शासकीय नोकरदार व्यक्तींना पगारवाढ किंवा पदोन्नती मिळाल्याने ते आनंदी असतील. दिवस फलदायी असेल. शासकीय नोकरदार व्यक्तींना पगारवाढ किंवा पदोन्नती मिळाल्याने ते आनंदी असतील. आज पोटदुखी, ताप, डोकेदुखी यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
धनू : तुम्हाला नोकरी आणि व्यावसायिक जीवनात तुमच्या मनासारख्या गोष्टी ऐकायला मिळतील आणि आर्थिक नफा मिळण्याचीही शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवे संपर्क निर्माण होतील जे फायदेशीर ठरतील. तुमच्या खर्चात अचानक वाढ झाल्याने तुमच्यासाठी चिंता वाढू शकते. तुमच्या आरोग्याबाबत जागरुक राहणे आवश्यक आहे.
मकर : रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल; पण खर्च करताना तुमचं उत्पन्न लक्षात घ्या. अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागेल. तुमची तब्येत बिघडलेली असेल, तर आज त्यात सुधारणा असेल. त्यामुळे तुम्हाला समाधान वाटेल आणि कामाकडे लक्ष देऊ शकाल.
कुंभ : दिवस संमिश्र फलदायी असेल. तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणाबाबत थोडी चिंता जाणवेल. त्यासाठी तुम्ही त्यांच्या शिक्षकांशी किंवा कुटुंबातल्या ज्येष्ठ सदस्याशी संवाद साधू शकता. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळू शकते. व्यवसायात अचानक आर्थिक लाभ मिळाल्याने आनंद वाटेल.
मीन : रोजगार, नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला आहे. कारण त्यांना इच्छेनुसार चांगली संधी मिळू शकते. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या काही शत्रूंपासून सावध राहावं लागेल. कारण ते तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात. मुलांकडून एखादी चांगली बातमी समजेल. त्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल.