शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तू जास्तचं भोगलं आहेस अन्…”, केदार शिंदेंची बायकोसाठी भावुक पोस्ट, “माझ्या आयुष्यात येणं ही…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 5, 2024 | 10:54 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
kedar shinde shared birthday special post for her wife bela shinde on social media account

"तू जास्तचं भोगलं आहेस अन्…", केदार शिंदेंची बायकोसाठी भावुक पोस्ट, "माझ्या आयुष्यात येणं ही…"

मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय व प्रसिद्ध नावांपैकी एक नाव म्हणजे केदार शिंदे. आजवर अनेक नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांतून केदार शिंदे यांनी प्रेक्षकांना नेहमीच भारावून टाकले आहे. केदार शिंदे यांनी दिग्दर्शन, निर्मिती व अभिनय अशा तीनही क्षेत्रांतून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. आजवर त्यांनी विविध कलाकृती सादर करत मराठी मनोरंजन विश्वात अमूल्य योगदान दिले आहे. या काळात त्यांनी अनेक चढ-उतार व संघर्ष पाहिला आहे. पण त्यांना मिळालेल्या यशात त्यांच्या पत्नीचाही तितकाच मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी अनेकदा म्हटले आहे. (Kedar Shinde On Instagram)

केदार शिंदे हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक फोटो, व्हिडीओ त्याचबरोबर आपल्या कामाची माहितीही देत असतात. अशातच केदार शिंदे यांनी त्यांच्या पत्नीसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. केदार शिंदे यांची पत्नी बेला शिंदे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसासानिमित्त केदार यांनी एक खास पोस्ट करत पत्नीचे कौतुक केले आहे. केदार शिंदे यांनी पत्नीबरोबरचा एक सुंदर फोटो पोस्ट केला असून या फोटोखाली लिहिलेल्या पोस्टने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

आणखी वाचा – “तुमच्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती…”, ‘त्या’ बोल्ड फोटोंमुळे सई ताम्हणकर ट्रोल, नेटकरी संतापून म्हणाले, “शोभतं का हे?”

केदार शिंदे यांनी या पोस्टमध्ये असं म्हटले आहे की, “हा फोटो एकदम उलट हवा होता. कारण, तू पाठीशी खंबीरपणे उभी होतीस म्हणून मी काहीतरी करू शकलो. तुझं माझ्या आयुष्यात येणं ही स्वामी कृपा आहे. तू माझ्या चांगल्या वाईट दिवसांत, मिळेल ते स्वीकारत गेलीस. माझ्यातील कला, माझ्या आयुष्यातले चढ-उतार हे तू जास्तच भोगले आहेस. आज ५१ वर्षे होत आहेत पण, तू माझी मैत्रीण, बायको आणि वेळप्रसंगी आई झालीस. आजवर तू माझ्यासाठी खूप काही केलं आहेस, करते आहेस आणि या पुढे ही करत राहशीलच याची मला खात्री आहे. तुला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.”

आणखी वाचा – Video : करीना-सैफच्या लेकांमध्ये भांडणं, तैमुर कारमध्ये पुढे बसलेला पाहून जोरजोरात रडू लागला जेह, आईने हाताला धरलं अन्…

दरम्यान, गेले वर्ष हे केदार शिंदे यांच्यासाठी खास होतं. २०२३ मध्ये केदार यांनी  ‘’महाराष्ट्र शाहीर’ आणि ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. केदार यांच्या या दोन्ही चित्रपटांनी २०२३ मध्ये यशस्वी कामगिरी केली. त्यांचा बाईपण भारी देवा हा चित्रपट तर चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडला. त्यामुळे आता नवीन वर्षात केदार प्रेक्षकांच्या भेटीला काय घेऊन येणार आहेत?, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

Tags: entertainment newskedar shindemarathi directormarathi entertainmentMarathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
actress kranti redkar shared her daughters cute video on her instagram account

“देवबाप्पा जेवण बनवत आहे कारण…”, धुकं पाहून क्रांती रेडकरची लेक काय म्हणाली ऐका, अभिनेत्री म्हणते, “माझ्या भाच्याचं निधन…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.