बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मुलगा मुळचा आगाऊ असेल”, KBC प्रकरणावर मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट, म्हणाले, “आगाऊपणे बच्चनसाहेबांना…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 17, 2025 | 11:10 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
marathi actors ishit bhatt

"मुलगा मुळचा आगाऊ असेल", KBC प्रकरणावर मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट, म्हणाले, "आगाऊपणे बच्चनसाहेबांना…"

marathi actors ishit bhatt : ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमामुळे चर्चेत आलेला १० वर्षीय बालक इशीत भट्ट सध्या चर्चेत आला आहे. हॉटसीटवर बसलेल्या इशीतने दिलेल्या उत्तरांनी तो साऱ्यांच्या नजरेत आला आहे. अमिताभ बच्चन यांना उलट उत्तर दिल्याने या १० वर्षीय मुलाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. केबीसीच्या नियमानुसार अमिताभ बच्चन खेळ सुरु होण्याआधी प्रत्येक स्पर्धकाला खेळाचे नियम समजावून सांगतात. याप्रमाणे अमिताभ सांगत असताना इशीतने त्यांना उलट उत्तर करत “मला कोणतेही नियम वगैरे सांगत बसू नका, मला सगळं माहित आहे”, असं म्हटलं. आणि त्यानंतर प्रश्नोत्तराच्या खेळातही इशीत वेळोवेळी उलट उत्तर देताना दिसला. प्रश्न विचारल्यानंतर पर्याय देण्याधीच तो उत्तर देऊन मोकळं व्हायचा. पण पाचव्या प्रश्नाला त्याचा हा कॉन्फिडन्स त्याला नडला.

केबीसीमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आणि हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्या मुलाला ट्रोलही केलं. यावर आता मराठी अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी मार्मिक पोस्ट केली आहे. त्यांनी पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “अजून विषय ताजा आहे. तर मी ही बोलून घेतो. एकतर शोची creative team या सगळ्या मुलांना रीतसर brief करते. मुलांना माफक आगाऊपणे बच्चनसाहेबांना काहीतरी उत्तरं द्यायला सांगितलं जातं. त्यांचा आगाऊपणा आणि त्यावरची बच्चनसाहेबांची प्रतिक्रिया हे कार्यक्रमात humour आणतात. यापुर्वी आणि आतासुध्दा लहान मुलांचे सगळे एपिसोड्स TRP च्या दृष्टीने यशस्वी झाले आहेत. अनेक मुलांनी यापुर्वीही थोडाफार आगाऊपणा तिथे केला आहे. पण तो smartness, cuteness च्या सीमारेषेवर राहीला. हा जो भट मुलगा आहे त्यालाही त्याचा ओवर स्मार्टनेस पाहुन आधी प्रोत्साहन दिलं गेलंय हे नक्की”.

आणखी वाचा – गुंता अधिक वाढणार, सारंग–आदित्य अडचणीत आणि…; मदतीला अहिल्यादेवी धावणार का?

“पण हा मुलगा वहावत गेला. एकतर hot seat वर येणं आणि पहिले काही प्रश्न सोपे येणं यातुन त्याचा आगाऊपणा उर्मटपणात बदलला. शिवाय creative team कडुन आधीच मिळालेलं प्रोत्साहन, या सगळ्याचा परिणाम दिसला. या मुलाला ADHD syndrome असण्याबाबत बालमानसशास्त्रज्ञानी केलेलं निदान योग्य आहेच. शिवाय माझ्या अंदाजाने त्याला अजुन एक syndrome आहे. ‘शिनचॅन सिंड्रोम’. “सवाल तो पुछो” “ऑप्शन तो बताओ” हा जो त्याचा सूर आहे तो त्या शिनचॅन नामक महाआगाऊ, उर्मट आणि लहान मुलात लोकप्रिय अशा कार्टून मुलाचा सूर आहे”.

View this post on Instagram

A post shared by Swapnil Raajshekhar (@swapnil.rajshekhar)

पुढे त्याने लिहिलं आहे की, “शिनचॅन पहात मोठी झालेली मुलं साधारणपणे याच छापाचं बोलतात. याची जबाबदारी अर्थात पालकांची असते. थोडक्यात, मुलगा मुळचा आगाऊ असेल, single child असल्यामुळे over pampered असेल, सिंड्रोमग्रस्त असेल पण त्याच्या वर्तणुकीला वर उल्लेखीत ईतरही घटक कारणीभूत आहेत. आधीच मर्कट तशात मद्य प्याला, तशात वृश्चिक दंश झाला’, असं झालंय त्याचं. बरं पहिली जी मिनिटभराची एडीटेड क्लिप वायरल झाली, त्याने या मुलाबद्दल संतापाची जोरदार लहर निर्माण केली. पण सोशल मिडीयावर जो पुर्ण लांबीचा व्हिडीओ आहे, तो पाहिल्यावर या मुलाचा तेवढा राग येत नाही. हे सुध्दा बोलकं आहे”.

आणखी वाचा – हार्दिक जोशीचं मराठी प्रेम, तामिळमधील लोकांना देतोय मराठीचे धडे, व्हिडीओ तुफान व्हायरल

शेवटी त्याने लिहिलं आहे की, “आणि एक, सोनी लिवने त्या एपीसोड मधुन या मुलाचा भाग संपुर्ण काढला आहे. पण thumbnail याच मुलाचा ठेवलाय. अशी मजा. तस्मात, देशाने त्याला सोडावं आता. झालं तेवढं पुरे झालं. अतीच हेटाळणी झाली त्याची. अनेक राजकारणी याहुन जास्त उर्मटपणा रोज करतात, आपलाच पैसा लाटुन आपल्यालाच माज दाखवत फिरतात.. त्यांचं काय करतो आपण ?,हा तर लहान मुलगा आहे”.

Tags: ishit bhattkaun banega crorepatimarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Kubbra Sait On Her Abortion

"अनेकदा आजारपण…", वयाच्या ३० व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा झालेला गर्भपात, म्हणाली, "तीव्र रक्तस्त्राव होत होता आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.