सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हार्दिक जोशीचं मराठी प्रेम, तामिळमधील लोकांना देतोय मराठीचे धडे, व्हिडीओ तुफान व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 16, 2025 | 3:49 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Hardik Joshi

हार्दिक जोशीचं मराठी प्रेम, तामिळमधील लोकांना देतोय मराठीचे धडे, व्हिडीओ तुफान व्हायरल

Hardik Joshi : अभिनेता हार्दिक जोशी याने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. ही मालिका संपून बराच कालावधी उलटला तरीही प्रेक्षक आजही त्याला राणादा या नावाने हाक मारतात. हार्दिक मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचं नेहमीच मनोरंजन करत असतो. पण आता लवकरच तो एका तामिळ प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या प्रोजेक्टनिमित्त हार्दिक तामिळनाडूला शूटिंगसाठी गेल्याच पाहायला मिळालं. हार्दिक सोशल मीडियावर ही कायम सक्रीय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या

पण सध्या त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे हार्दिक जोशी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हार्दिक जोशी सध्या एका प्रोजेक्टनिमित्त तामिळनाडूमध्ये शूटिंग करत आहे. आणि या दरम्यान त्याचे तामिळ कॉस्ट्यूम डिझायनर आणि आर्टिस्ट त्याला मराठी शिकवताना हार्दिक जोशी या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तर व्हिडीओमध्ये ते आर्टिस्ट काही वाक्य बोलताना दिसत आहे आणि त्याच ट्रान्सलेशन करुन हार्दिक त्यांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न करत आहे.

आणखी वाचा – “तिनं स्वतःच खूप चुका केल्या आहेत”, सुनीता अहुजानंतर आता गोविंदा बोलला, पत्नीबाबत म्हणाला, “नाही बोललं पाहिजे तेसुद्धा…”

तसेच त्याने या व्हिडीओमध्ये त्यांना मराठी वाचायला देखील शिकवत आहे. तर याबद्दल सांगताना हार्दिक जोशी म्हणाला की, प्रत्येक भाषा शिक्षण महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. प्रत्येक भाषेत गोडवा असतो. आणि मी देखीलही भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहे. नवीन भाषा दोन-तीन दिवसात शिकणं शक्य नाही आहे. पण जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं शिकण्याचा प्रयत्न करु. जर आपण वेगवेगळ्या ठिकाणी जात आहोत तर तेथील भाषा explore करणं गरजेचं आहे. असं त्याने या व्हिडीओमध्ये सांगितलं.

आणखी वाचा – “मला दैवी देणगी आहे”, निगेटिव्हिटी घरी घेऊन जाण्याबाबत माधवी निमकर स्पष्टच बोलली, म्हणाली, “त्याचा चेहरा बघितल्यावर…”

इतकंच नाही तर त्याच्या कॉस्च्युम डिझाइनरने तामिळ भाषेत त्याच्यासाठी काही भावना व्यक्त केल्या होत्या. ते ही त्यांनी वाचून दाखवल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं. इतकंच नव्हे तर त्यांनी हार्दिककडून काही मराठी शब्द शिकून त्यांच्या प्रयत्नाने मराठीत हार्दिकबद्दलच्या भावना आणि त्याच्यासह काम करण्याचा अनुभव सांगितला.

Tags: Hardik Joshimarathi actortamil language
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Next Post
marathi actors ishit bhatt

"मुलगा मुळचा आगाऊ असेल", KBC प्रकरणावर मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट, म्हणाले, "आगाऊपणे बच्चनसाहेबांना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.