सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गुंता अधिक वाढणार, सारंग–आदित्य अडचणीत आणि…; मदतीला अहिल्यादेवी धावणार का?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 16, 2025 | 2:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi serial twist

गुंता अधिक वाढणार, सारंग–आदित्य अडचणीत आणि…; मदतीला अहिल्यादेवी धावणार का?

Marathi serial twist : दोन प्रेक्षकप्रिय मालिका ‘पारू’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’ पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. एका विशेष महासंगमासाठी या दोन मालिका एकत्र येणार आहेत. नाट्यपूर्ण घडामोडी, आणि मैत्रीच्या नव्या रंगांनी सजलेला हा ट्रॅक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणार आहे. या महासंगमात काही जुने रहस्य खुले होणार आहेत, तर काही नात्यांना नवे वळण मिळणार आहे. शिवानीने आखलेला धोकादायक प्लॅन सारंगच्या कुटुंबाला अडचणीत टाकण्यास सुरुवात करतो. छोट्या छोट्या घटनांमधून गोंधळ वाढत जातो आणि नाती धोक्याच्या टोकावर पोहोचतात.

दरम्यान, तिलोत्तमा आणि चंद्रकांत यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी किर्लोस्कर कुटुंब आणि आदित्य–पारू यांना आमंत्रण दिलं जातं. हा क्षण आनंदाचा असला तरी प्रत्येकाच्या मनात शंका आणि ताण असतो. पार्टी दरम्यान, अहिल्या आणि पारू समोरासमोर येतात. यावेळी पारू-आदित्यला समोर पाहून अहिल्यादेवींच्या राग अनावर होतो. त्यावेळी त्या तिलोत्तमाला जाबही विचारतात. यादरम्यान जुन्या गोष्टी आणि भावनिक संघर्ष पुन्हा उफाळून येतात. त्याचवेळी, एक जुनी मर्डर केस पुन्हा बाहेर येणार आहे. त्यात सारंग व आदित्य त्यात अडकणार आहेत.

आणखी वाचा – पंकज धीर पाठोपाठ दिग्गज बॉलिवूड अभिनेत्रीचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

यात सारंग कोर्टाच्या खटल्यात अडकणार आहेत. कोर्टात अहिल्या विरुद्ध पारू–आदित्य असा संघर्ष उभा राहणार आहे. दुसरीकडे, शिवानी आणि सावली–सारंग यांच्यातील संघर्षही वाढला आहे. सावली आणि पारू एकत्र येऊन या कठीण प्रसंगाला सामोरं जाणार आहेत. केस अधिक गुंतागुंतीची होत असताना वकील म्हणून कालिंदीची दमदार एन्ट्री होणार आहे.

आणखी वाचा – “मला दैवी देणगी आहे”, निगेटिव्हिटी घरी घेऊन जाण्याबाबत माधवी निमकर स्पष्टच बोलली, म्हणाली, “त्याचा चेहरा बघितल्यावर…”

कालिंदीच्या हुशारीमुळे सारंगची केस एका रोमांचक वळणावर येणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सारंग – सावलीच्या घरात आनंदाने गृहप्रवेश होणार आहे. तर आदित्यचा मर्डर केसमध्ये काही संबंध नाही आहे त्याचा त्याला काही त्रास होणार नाही”, असं समोर आलेल्या प्रोमोमध्ये अहिल्यादेवी फोनवरुन बोलताना दिसत आहेत. यामुळे अहिल्यादेवी आदित्य-पारूचा स्वीकार करणार का?, याचे संकेत मिळत आहेत. मालिकेत पुढे कोणते ट्विस्ट येणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Tags: marathi serialpaaruzee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Next Post
Hardik Joshi

हार्दिक जोशीचं मराठी प्रेम, तामिळमधील लोकांना देतोय मराठीचे धडे, व्हिडीओ तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.