टीव्हीवरील काही लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’. हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे त्याचबरोबर त्यांच्या ज्ञानातही भर घालत आहे. या कार्यक्रमात येणारे अनेक स्पर्धक ही त्यांची काही स्वप्ने घेऊन येतात आणि या मंचावरून त्यांच्या स्वप्नपूर्तीकडे प्रवास करतात. सध्या या कार्यक्रमात ‘केबीसी ज्युनियर्स वीक’ अर्थातच लहान मुलांचा विशेष सप्ताह सुरु आहे. यात अनेक लहान व हुशार मुलं सहभागी होत आपली हुशारी दाखवत आहेत. (Kaun Banega Crorepati Youngest Crorepati Mayank)
या ज्युनिअर्स वीक मध्ये हरियाणातील महेंद्रगड येथील १३ वर्षांच्या मयंकने सहभाग घेतला होता. आपल्या हुषारीने त्याने या स्पर्धेत आपलं नशीब आजमावले आहे. मयंकने हॉट सीटवर आपली जागा आणि आपल्या हूशारीने करोडोंची रक्कमही जिंकली. यावेळी अमिताभ यांनी मयंकबरोबर कोडिंग व ए. आयसारख्या आजच्या बदलत्या तंत्रज्ञानाविषयी चर्चा केली.
यावेळी बिग बी मयंकला “२०२३ मध्ये वॉशिंग्टन डीसीमध्ये उद्घाटन झालेल्या ‘समानतेचा पुतळा’ कोणाच्या नावावर आहे?” हा ६ लाख ४० हजार रुपयांसाठीचा प्रश्न विचारतात. यावर मयंक डॉ. भीमराव आंबेडकर असे बरोब उत्तर देतो. यानंतर ते या खेळातील १२ लाख ५० हजार रुपयांसाठीचा प्रश्न विचारतात. यावर मयंक प्रेक्षकांचा कौल घेत या प्रश्नाचे उत्तर देतो. यापुढे पुन्हा बिग बी त्याला २५ व ५० लाख रुपयांसाठीचे पुढचे प्रश्न विचारात. यांची बरोबर उत्तारे देत मयंक या खेळात यशस्वीपणे पुढे जातो.
यानंतर बिग बी मयंकला “नव्याने शोधलेल्या खंडाला ‘अमेरिका’ असे नाव देणारा नकाशा तयार करण्याचे श्रेय कोणत्या युरोपियन कार्टोग्राफरला जाते? हा एक कोटी रुपयांसाठीचा प्रश्न विचारतात. याचे उत्तर देण्यासाठी तो तज्ज्ञाची मदत घेतो आणि “मार्टिन वाल्डसीमुलर” असे उत्तर देतो. त्याच्या या उत्तरावर बिग बी लगेच “मयंक हा कौन बनेगा करोडपती या शोचा पहिला ज्युनिअर करोडपती आहे” असं म्हणत त्याला मिठी मारतात. यावेळी मयंकचे आईवडील भावुक झाल्याचेदेखील पाहायला मिळाले.