KBC 17 Registration : ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati 17) हा रिऍलिटी शो गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या ज्ञानात भर घालत आहे. आजवर या शोने तब्बल १६ सिझन पूर्ण केले आहेत. अमिताभ बच्चन यांचे सूत्रसंचालन असलेला हा शो रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या शोचा जगभरात खूप मोठा चाहतावर्ग आहे. आता या शोचा नवा सिझन केव्हा येणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत. अशातच केबीसीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अखेर प्रतीक्षा संपली. ‘कौन बनेगा करोडपती’ हा सिझन १७व्या हंगामासह परत येत आहे. ११ मार्च रोजी मागील सिझनच्या समाप्तीनंतर फक्त २४ दिवसांनंतर निर्मात्यांनी प्रसारित केलेल्या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन या एकमेव केबीसीच्या सूत्रसंचालकाची झलक पाहायला मिळत आहे.
‘केबीसी १७’साठी नोंदणी कधी सुरु होणार?
निर्मात्यांच्या या घोषणेसह, ‘केबीसी १७’ ची काउंटडाउन सुरु झाली आहे, कारण या महिन्यात येणाऱ्या नव्या शोसाठी नोंदणी देखील सुरु होत आहे. ४ एप्रिल रोजी, सोनी टीव्हीने त्याच्या इन्स्टाग्राम अधिकृत पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे, हे पाहून चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये, अमिताभ बच्चन मजेदार पद्धतीने पोट दुखीने ग्रस्त दिसत आहेत. यावेळी एक डॉक्टर त्यांची तपासणी करण्यासाठी येतात, तपासणीनंतर ते गमतीत असे म्हणतात की, बिग बी काहीतरी लपवत आहे, ज्यामुळे त्यांना पोटदुखीचा त्रास होत आहे. मग मेगास्टार शेवटी मोठी बातमी उघडकीस आणतो की, ‘कौन बनेगा करोडपती १७’ ची नोंदणी १४ एप्रिलपासून सुरु होईल.
प्रोमोच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “१४ एप्रिलपासून हॉट सीटवर येण्यास सज्ज व्हा. केबीसी आणि आमच्या एबी प्रश्नांची नोंदणी सुरु होणार आहे”. ‘कौन बनेगा करोडपती १६’ हा मागील भाग १६ ऑगस्ट २०२४ ते ११ मार्च २०२५ पर्यंत चालली. हा एक स्टार स्टॅम्प्ड शो होता ज्यात आमिर खान, जुनैद खान, विद्या बालन, फराह खान आणि अभिषेक बच्चन यांच्यासारख्या सेलिब्रिटींनी त्यांच्या प्रकल्पांची जाहिरात करण्यासाठी हॉट सीट गाठली.
‘केबीसी १७’ची प्रीमियर तारीख किती आहे?
त्याच वेळी, ‘केबीसी १७’ची नोंदणी लवकरच सुरु होणार आहे. ‘कौन बनेगा करोडपती १७’च्या प्रदर्शनाच्या तारखेसह चाहते उत्साहाने पुढील माहितीची प्रतीक्षा करीत आहेत. या शोचा नवा सिझन पडद्यावर कधी येईल याची निर्मात्यांनी अद्याप पुष्टी केलेली नाही. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की, केबीसीबद्दलची खळबळ पूर्वीपेक्षा जास्त आहे.