Manoj Kumar Networth : आज भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांचे निधन झाले. त्यांनी आज (४ मार्च) शुक्रवारी सकाळी जगाला निरोप दिला. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेतला. आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे ते बर्याच दिवसांपासून रुग्णालयात होते. चाहते अभिनेत्याच्या मृत्यूच्या बातमीनंतर हळहळले असून शोक व्यक्त करीत आहेत. अभिनेत्याच्या कुटुंबानेही त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. तर सिनेविश्वातील कलाकारांनीही शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या मागे संपूर्ण कुटुंब आहे. त्यांनी ५० वर्षे सिनेविश्वात अथक परिश्रम करत बक्कळ कमाई केली.
सेलिब्रिटी नेट वर्थनुसार मनोज कुमार यांच्या एकूण मालमत्तेचा अंदाज अंदाजे २० दशलक्ष डॉलर्स होता. म्हणजेच सुमारे एक कोटी रुपये. त्यांनी ही मालमत्ता भारतीय सिनेमात दीर्घ आणि यशस्वी कारकीर्दीसह बनविली, जिथे त्यांनी अभिनेता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक म्हणून काम केले. अभिनयाव्यतिरिक्त, त्यांनी त्यांच्या काही प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शनही केले, जे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. त्यांची कमाई आता त्यांच्या कुटुंबाला दिली जाईल.
आणखी वाचा – CID ला शिवाजी साटम यांचा कायमचा निरोप, एसीपी प्रद्युमन यांची अशी एक्झिट का?
मनोज कुमार यांची पत्नी शशी गोस्वामी या आहेत. ‘दैनिक जागरन’ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत त्यांनी आपली प्रेमकथा सांगितली आणि म्हणाली, “पदवीच्या दिवसात मी जुन्या दिल्लीतील मित्राच्या घरी जात असे आणि तिथेच मी पहिल्यांदा शशीला पाहिले. देवा शपथ, मी माझ्या संपूर्ण आयुष्यात वाईट हेतूने कोणत्याच मुलीला कधीच पाहिले नाही, परंतु शशीमध्ये अशी जादू होती की मी तिच्या चेहऱ्यावरुन माझी नजर हटवू शकलो नाही. आणि दीड वर्षांपर्यंत, आम्ही दोघांनीही फक्त दूरवरुन एकमेकांना पाहिले. कारण त्यावेळी आमच्यापैकी कोणीही एकमेकांशी बोलण्याचे धाडस केले नाही”.
आणखी वाचा – कुक असूनही सैफ अली खानच घरात जेवण का बनवतो?, करीना कपूरला अंडी उकडणंही जमेना, स्वतःच केला खुलासा
अभिनेत्याने पुढे स्पष्ट केले की, ते आणि त्यांची पत्नी शशी उड़नखटोला हा चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. ते पुढे म्हणाले, “आमच्या मित्रांसह हा चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही बर्याचदा भेटू लागलो. माझ्या पालकांना आमच्या नातेसंबंधात कोणताही आक्षेप नव्हता, परंतु शशीचा भाऊ आणि आई आमच्या विरोधात होते. मी माझ्या महाविद्यालयाच्या छतावर जायचो आणि शशी तिच्या घराच्या छतावर जायची जेणेकरुन आम्ही एकमेकांना पाहू शकू आणि कोणाच्याही हे नजरेत येऊ नये”. मनोज आणि शशी यांचा मुलगा कुणाल गोस्वामी यांनी १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जय हिंद’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले. तथापि, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. अनुभवी अभिनेत्याचा चुलत भाऊ टेलिव्हिजन निर्माता मनीष गोस्वामी हा आहे.