शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ओटी भरणाच्या कार्यक्रमात बायकोची काळजी घेताना दिसला रोनित पिसे, कार्तिकी गायकवाडचा हात हातात धरला अन्…; म्हणाला, “आगमनाची तयारी…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 30, 2024 | 5:01 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kartiki Gaikwad's husband Ronit Pise shared some special photos with her

ओटी भरणाच्या कार्यक्रमात बायकोची काळजी घेताना दिसला रोनित पिसे, कार्तिकी गायकवाडचा हात हातात धरला अन्...; म्हणाला, "आगमनाची तयारी..."

गायिका कार्तिकी गायकवाडने काल (२९ मार्च) रोजी सोशल मीडियावर ओटी भरणाचे काही खास फोटो शेअर करत ती आई होणार असल्याची बातमी शेअर केली. लग्नाच्या चार वर्षानंतर कार्तिकीने आणखी एक गुड न्यूज दिली आहे. कार्तिकी आई होणार असून नुकतेच डोहाळं जेवणाचा कार्यक्रम पार पडला. याचा व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या गाण्याच्या शोमधून कार्तिकी घराघरांत पोहोचली आणि लोकप्रिय झाली.

आपल्या गाण्याने कायमच चर्चेत असणारी कार्तिकी सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे खास फोटो शेअर करत असते आणि सोशल मीडियाद्वारे ती तिच्या चाहत्यांना तिचे अपडेट्सही देत असते. अशातच तिने काल तिच्या ओटीभरणाच्या फोटोमुळे गायिका पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली. कार्तिकीच्या या ओटीभरणाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. या फोटोखाली तिला मराठीतील कलाकारांसह तिच्या अनेक चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या.

View this post on Instagram

A post shared by Ronit Pise (@ronit.pise)

आणखी वाचा – आठ वर्षांचा संसार मोडला, एक लेक अन्…; आमिर खानचा भाचा आता गर्लफ्रेंडबरोबर भाड्याच्या घरामध्ये राहणार, महिन्याचं भाडं आहे तब्बल…

अशातच आता कार्तिकीच्या नवऱ्यानेही तिचे कालच्या ओटी भरणाच्या कार्यक्रमाचे खास फोटो शेअर केले आहेत. “कोणीतरी येत आहे आणि आम्ही त्याच्या आगमनाची तयारी करत आहे” असं म्हणत रोनित पिसेने कार्तिकीबरोबरचे खास फोटो शेअर केले आहेत. यावेळी रोनित कार्तिकीची चांगलीच काळजी घेताना दिसला. स्टेजवर चढताना रोनितने कार्तिकीचा हात धरत तिला आधार दिल्याचे पाहायला मिळाले. या फोटोमध्ये रोनितचे आई-वडील, कार्तिकीचे आई-वडील त्याचबरोबर कार्तिकीचे भाऊही दिसत आहेत.

आणखी वाचा – रात्रीचे स्मशानामध्ये जायचे सद्गुरु जग्गी वासुदेव, जळत्या चितेमधून शरीराचे तुकडेही काढायचे अन्…; स्मशानामध्ये नेमकं ते काय करायचे?

ओटी भरणाच्या या खास कार्यक्रमात कार्तिकी व तिचा नवरा रोहित पारंपरिक लूकमध्ये दिसले. कार्तिकीने या खास कार्यक्रमासाठी हिरव्या रंगाची जरीची सुंदर साडी नेसली होती, तर रोहितने पांढऱ्या रंगाची पठाणी शेरवानी परिधान केली होती. कार्तिकीने या खास सोहळ्यासाठी खास पारंपरिक दागिनेही घातले होते. दरम्यान, कार्तिकीने रोनित पिसेबरोबर २०२० मध्ये विवाहगाठ बांधली होती. त्यांच्या या विवाह सोहळ्याची चांगलीच चर्चा झाली होती. अशातच आता लग्नाच्या चार वर्षानंतर कार्तिकी आई होणार असल्याची गुडन्यूज शेअर केली आहे. त्यामुळे कार्तिकी आई होणार असल्याचे समोर आल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.  

Tags: kartiki gaikwadmarathi entertainment newsronit pise
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Randeep Hooda

'स्वातंत्र्यवीर सावरकर'ला थंड प्रतिसाद, प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यानंतर रणदीप हुड्डाला दुःख, म्हणाला, "बाबांची प्रॉपर्टी विकली, तब्येतीचंही नुकसान अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.