रविवार, एप्रिल 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आठ वर्षांचा संसार मोडला, एक लेक अन्…; आमिर खानचा भाचा आता गर्लफ्रेंडबरोबर भाड्याच्या घरामध्ये राहणार, महिन्याचं भाडं आहे तब्बल…

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 30, 2024 | 1:01 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Imran Khan will live in Karan Johar's rented house with girlfriend Lekha Washington see the details

आठ वर्षांचा संसार मोडला, एक लेक अन्...; आमिर खानचा भाचा आता गर्लफ्रेंडबरोबर भाड्याच्या घरामध्ये राहणार, महिन्याचं भाडं आहे तब्बल...

‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता म्हणजे इम्रान खान. मागच्या काही काळापासून इम्रान त्यांच्या पत्नीबरोबरच्या बिघडलेल्या नातेसंबंधांमुळे चांगलाच चर्चेत आहेत. इम्रान खानने २०११ मध्ये अवंतिका मलिकबरोबर लग्न केलं होतं. मात्र, २०१९ मध्ये या दोघांमध्ये भांडण सुरू असल्याचं समोर आलं. त्यानंतर सातत्यानं या दोघांमध्ये घटस्फोट झाल्याच्या अनेक चर्चा रंगताना दिसल्या. त्यामुळे आपल्या वैवाहिक आयुष्यामुळे किंवा खाजगी आयुष्यामुळे हा अभिनेता कायमच चर्चेत राहत असतो.

अशातच नुकताच त्याने लेखा वॉशिंग्टनबरोबरच्या नात्याबद्दलही खुलासा केला. वोग इंडियाला दिलेल्या मुलाखतीत इम्रानने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे अनेक खुलासे केले. यावेळी इम्रानने लेखा वॉशिंग्टनबरोबरच्या त्याच्या नात्याला दुजोरा दिला होता. अशातच आता अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे त्याने नुकतेच मुंबईत घर घेतले आहे. इम्रानने चित्रपट निर्माता करण जोहरचे जुने अपार्टमेंट भाड्याने घेतले असून तो त्याची गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टनबरोबर या अपार्टमेंटमध्ये राहणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Imran Khan (@imrankhan)

आणखी वाचा – “तुला परफॉर्म करताना पाहिलं तेव्हा…”, ‘चंद्रा’ गाणं घडवणाऱ्या आशिष पाटीलने सुरु केला स्वतःचा डान्स स्टुडिओ, अमृता खानविलकर म्हणाली, “मेहनत…”

काही मीडिया रिपोर्टनुसार, इम्रानने करण जोहरचे वांद्रे येथील ३ मजली सी-फेसिंग अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे. हे अपार्टमेंट क्लिफपेट, पाली हिल येथे आहे आणि इम्रान गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टनबरोबर या घरात राहण्यास आला आहे. या जोडप्याने करण जोहरचे घर तीन वर्षांच्या करारावर भाड्याने घेतले असून त्यासाठी त्यांना दर महिन्याला करण जोहरला नऊ लाख रुपये भाडे द्यावे लागणार आहे.

आणखी वाचा – “मला एक सावली दिसायची आणि…”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’च्या सेटवर रणदीप हुड्डाला दिसायचं काही भलतंच, भयावह अनुभव सांगत म्हणाला, “श्वास कोंडला तेव्हा…”

दरम्यान, इम्रानने ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली. यानंतर तो ‘आय हेट लव्ह स्टोरीज’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘लक’ आणि ‘किडनॅप’सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसला. पण त्याचे चित्रपटातील करिअर काही खास नव्हते आणि त्यानंतर त्याने स्वत:ला मनोरंजन विश्वापासून दूर केले. नुकतीच त्याने चित्रपटसृष्टीमधील पुनरागमनाची घोषणा केली होती. परंतु, अद्याप याविषयी काहीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Tags: Bollywood entertainment newsbollywood newsimran khan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 air conditioner health risks
Lifestyle

AC Side Effects : उन्हाळ्यात AC चा अतिवापर आरोग्यासाठी घातक, थकवा, डोकेदुखी आणि…

एप्रिल 26, 2026 | 4:00 pm
 Arijit Singh Net Worth
Entertainment

आलिशान कार, अपार्टमेंट आणि…; बॉलिवूड गायकाकडे आहे करोडो रुपयांची मालकी, लाइव्ह कॉन्सर्टसाठी घेतो मोठी रक्कम

एप्रिल 26, 2026 | 11:00 am
Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
Next Post
Prasad Khandekar On Bhargavi Chirmuley Birthday

"सहकार्य करणारे कलाकार खूप कमी आणि…", भार्गवी चिरमुलेबरोबरचा फोटो शेअर करत प्रसाद खांडेकरची पोस्ट, म्हणाला, "पहाटे शिफ्ट संपते तेव्हा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.