सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

करिश्मा कपूरच्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या मृत्यूचं धक्कादायक खरं कारण समोर, हृदयविकाराचा झटका आला पण…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 13, 2025 | 1:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
karisma kapoor ex husband death

करिश्मा कपूरच्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या मृत्यूचं धक्कादायक खरं कारण समोर, हृदयविकाराचा झटका आला पण...

करिश्मा कपूरचा पूर्वाश्रमीचा पती संजय कपूर यांचं निधन झालं आहे. ते ५३ वर्षांचे होते. गुरुवारी (१२ जून) लंडनमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संजय यांच्या निधनाचं वृत्त समोर येताच कुटुंबियांसह अनेकांना मोठा धक्का बसला. या धक्क्यामागचं कारणंही तसंच होतं. मृत्यूच्या काही क्षणांपर्यंत संजय सोशल मीडियावर सक्रिय होते. त्यांच्या काही पोस्टही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान संजय यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्यामुळे झालं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र आता एक वेगळं कारण समोर आलं आहे. संजय यांचं निधन नक्की कशामुळे झालं? याची खरी माहिती आता समोर आली आहे. (karisma kapoor ex husband death)

संजय यांच्या मृत्यूचं वृत्त समजताच करीना कपूर, सैफ अली खान, मलायका अरोरा, अमृता अरोरा करिश्मा कपूरच्या घरी पोहोचले. करिश्मासह तिच्या लेकीचंही सांत्वन केलं. संजय यांना पोलो खेळ खेळायची खूप आवड होती. ते ग्लँडमधील गार्ड्स पोलो क्लबमध्ये खेळत होते. दरम्यान खेळत असतानाच ते अचानक खाली कोसळले. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.

आणखी वाचा – तीन लग्न, हृदयविकाराच्या झटक्याने निधन अन्…; करिष्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती घटस्फोटामुळे राहिलेले चर्चेत, कोण होते संजय कपूर?

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

संजय यांच्या निधनामागील एक वेगळंच कारण समोर येता अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. त्यांचा मृत्यू एका मधमाशीमुळे झाला आहे. अभिनेता व लेखक सुहेल शेठने ANI शी संवाद साधताना याबाबत माहिती दिली. सुहेल म्हणाला, “संजय घोड्यावर बसून पोलो खेळ खेळत होता. दरम्यान त्यांनी चुकून मधमाशी गिळली. त्यांच्या गळ्यात ती मधमाशी अडकली. त्यानंतर त्यांना घशाला जळजळ होऊ लागली. यामध्ये ते घाबरले. संजय यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला”.

आणखी वाचा – अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर मराठी कलाकारही हळहळले, श्रद्धांजली वाहत थेट परमेश्वरालाच केला सवाल

निधनाच्या काही तासांपूर्वी ते सोशल मीडियावरही सक्रिय होते. त्यांनी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताबाबत पोस्टही शेअर केली होती. “अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमान अपघाताची घटना खूपच दुःखद आहे. या अपघातातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मी प्रार्थना करतो. या कठीण प्रसंगांमध्ये देव त्यांना ताकद देवो”, अशी पोस्ट संजय यांनी शेअर केली होती. मात्र क्षणात संजय यांचं होत्याचं नव्हतं झालं.

Tags: bollywood newsentertainment newsKarishma Kapoor
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Next Post
Karisma Kapoor Sanjay Kapur Wedding Video

Video : करिष्मा कपूरच्या लग्नात करीनाचा नखरा, नवरीसारखा डोक्यावरुन पदर घेतलेला आणि…; लूक पाहून चाहते हैराण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.