मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सतत मारहाण, आजारी मुलाला सोडून गेला अन्…; करिश्मा कपूरने पूर्वाश्रमीच्या पतीवर केलेले गंभीर आरोप, वाईट वडील म्हणत…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 18, 2025 | 3:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
sunjay kapur karisma kapoor allegations

सतत मारहाण, आजारी मुलाला सोडून गेला अन्...; करिश्मा कपूरने पूर्वाश्रमीच्या पतीवर केलेले गंभीर आरोप, वाईट वडील म्हणत...

करिश्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर यांचं १२ जूनला इंग्लंडमध्ये निधन झालं. पोलो खेळ खेळत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. दरम्यान रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. मात्र अवघ्या ५०शीमध्येच संजय यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेला सहा ते सात दिवस उलटून गेले तरीही त्यांचं पार्थिव अजूनही कुटुंबियांच्या हाती आलेलं नाही. याबाबत बरेच प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. संजय यांची तिसरी पत्नी प्रिया सचदेवही बेपत्ता असल्याचं बोललं जात आहे. या सगळ्या अडचणींमध्ये आता करिश्माने संजय यांच्यावर केलेले आरोप पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. (sunjay kapur karisma kapoor allegations)

नंदिता महितानी व करिश्मा कपूर संजय यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी आहेत. दोन घटस्फोट झाल्यानंतर संजय तिसरी पत्नी प्रिया सचदेवसह सुखाने संसार करत आहेत. दोघांना अजरियास नावाचा सहा वर्षांचा मुलगाही आहे. २०१६मध्ये संजय यांच्यावर करिश्माने अनेक आरोप केले. या आरोपांना संजय यांनीही कायदेशीर स्वरुपात उत्तर दिलं. दरम्यान करिश्माला त्यांनी ७० कोटी रुपये पोटगी दिली असल्याचंही वृत्त समोर आलं होतं. तसेच मुलांना त्यांनी महागडे गिफ्टही दिले.

आणखी वाचा – “त्याची जगण्याची इच्छाच नव्हती कारण…”, भावाच्या निधनाबाबत पहिल्यांदाच बोलला राहुल देव, म्हणाला, “खाणं-पिणं सोडलं आणि…”

View this post on Instagram

A post shared by Karisma Kapoor (@therealkarismakapoor)

पोलो खेळ खेळण्यातच संजय दंग असायचे. यादरम्यान त्यांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं असल्याचे अनेक आरोप करिश्माने केले होते. २००३मध्ये करिश्मा व संजय यांनी लग्न केलं. २०१६मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दरम्यान घटस्फोटाची प्रक्रिया सुरु असताना मानसिक व शारीरिक शोषण केले असल्याचे आरोप करिश्माने संजय यांच्यावर केले होते. हनिमूनला स्वतःच्या मित्रांबरोबर वेळ घालवण्यासाठी करिश्मावर जबरदस्ती केली असल्याचाही दावा तिने केला होता.

आणखी वाचा – “माझ्यावर काळी जादू, मरणाची इच्छा अन्…”, प्रेमानंदजी महाराजांना भेटायला गेला सुप्रसिद्ध अभिनेता, दिलं सडेतोड उत्तर

संजय करिश्माला नेहमी मारायचे. मारहाण केल्याचे निशाण ती मेकअपने लपवत असल्याचंही करिश्माने सांगितलं होतं. करिश्माने कोर्टात सांगितलं होतं की, संजय यांना पोलो या खेळाची अधिकच आवड होती. मुलगा कियान चार महिन्याचा असताना आजारी होता. तेव्हा सगळं सोडून ते पोलो खेळ खेळायला गेले. करिश्माने सांगितलेलं की, “मी प्रसिद्ध व यशस्वी अभिनेत्री होती म्हणूनच संजयने माझ्याशी लग्न केलं होतं. मीडियामध्ये सतत चर्चेत राहणं त्यासाठी सोपं झालं होतं”. मात्र घटस्फोटानंतरही मुलांसाठी दोघं संपर्कात होते अशा चर्चा होत्या.

Tags: bollywood newsentertainment newsKarishma Kapoor
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Hemant Dhome on hindi third language controversy

"महाराष्ट्रात मराठीच…", हिंदी भाषा सक्तीवर हेमंत ढोमे भडकला, म्हणाला, "मेंदूला किती ताण देणार? आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.