बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“महाराष्ट्रात मराठीच…”, हिंदी भाषा सक्तीवर हेमंत ढोमे भडकला, म्हणाला, “मेंदूला किती ताण देणार? आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 18, 2025 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Hemant Dhome on hindi third language controversy

"महाराष्ट्रात मराठीच…", हिंदी भाषा सक्तीवर हेमंत ढोमे भडकला, म्हणाला, "मेंदूला किती ताण देणार? आणि…"

Hemant Dhome on hindi third language controversy : राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय कायम ठेवल्यानंतर आता हा वाद पुन्हा एकदा पेटून उठणार असल्याचं चित्र दिसत आहे. इंग्रजी, मराठीबरोबरच हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय राज्य सरकानं घेतल्यानंतर त्यांच्या या निर्णयाला मोठा विरोध झाला. यावर आता मराठमोळा या अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमेनेही भाष्य करत सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. अभिनेत्याने ट्विट शेअर करत या निर्णयावर टीका केली आहे. आजवर हेमंतने अनेकदा सामाजिक तसेच राजकीय वा न पटलेल्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. बरेचदा तो दुर्दैवी घटनांवरही आपलं मत मांडताना दिसतो. अशातच आता हेमंतने सरकारने हिंदी भाषा सक्तीची करताच आवाज उठविला आहे.

हेमंत ढोमेने ट्विट करत असं म्हटलं की, “हिंदी सक्ती मागे घेतली असं वाटणाऱ्या सर्वांसाठी! कृपया हा जीआर नीट वाचा. हिंदी ही तृतीय भाषा असेल. ज्यांना अन्य भाषा शिकायची इच्छा असेल त्यासाठी किमान 20 इच्छुक विद्यार्थी हवेत… (हा काय नियम आहे?) म्हणजे तिसऱ्या आणि त्यातही हिंदी भाषेची सक्ती असेल हे सरकारने ठामपणे सांगितलेले आहे… पहिल्या इयत्तेतल्या मेंदूला किती ताण देणार? आणि का? मातृभाषा मजबूत करण्यावर जोर का नाही? एक देश, एक भाषा! असं करायचं ठरवलंच आहे तर…”.

आणखी वाचा – हार्ट अटॅकनंतर अमोल बावडेकर यांचा रुग्णालयातील फोटो समोर, अभिनेत्याची प्रकृती स्थिर, कलाकार मित्राने दिली तब्येतीबाबत अपडेट

हिंदी सक्ती मागे घेतली असं वाटणाऱ्या सर्वांसाठी!

कृपया हा जीआर नीट वाचा…
हिंदी ही तृतीय भाषा असेल…
ज्यांना अन्य भाषा शिकायची इच्छा असेल त्यासाठी किमान 20 इच्छुक विद्यार्थी हवेत… (हा काय नियम आहे?)

म्हणजे तिसऱ्या आणि त्यातही हिंदी भाषेची सक्ती असेल हे सरकारने ठामपणे… pic.twitter.com/H9XaXOvYw1

— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) June 17, 2025

पुढे त्याने असं म्हटलं, “पडद्यामागून येणाऱ्या या सक्तीचा कडाडून निषेध! आता तुम्हीच ठरवा, नेमकं काय अभिजात होतंय?”. हेमंतचं हे ट्विट सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. सरकारनं २० इच्छुक विद्यार्थ्यांचा जो निमय केला आहे, त्यानं पालक तसंच विद्यार्थ्यांचीही दिशाभूल तर होत नाहीये ना…असा प्रश्न प्रत्येक स्तरातून विचारला जात आहे”.

आणखी वाचा – दुचाकीवरुन अपघात, पायाला १८ टाके अन्…; कठीण प्रसंगातही मराठी अभिनेत्रीने केले सलग तीन प्रयोग, म्हणाली, “दुखापत असतानाही…”

शालेय शिक्षण विभागानं यंदा हिंदी ही पहिल्या इयत्तेपासून तिसरी भाषा म्हणून घोषित केल्यानं प्रचंड विरोध झाला. त्यानंतर दादा भुसे यांच्यावर हा निर्णय मागे घेण्याची वेळ आली. या वर्षी पहिलीपासून तिसरी भाषा नसेल, असे त्यांनी जाहीर केले. मात्र त्याबाबत लेखी निर्णय जाहीर झाला नव्हता. अखेर शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, मंगळवारी रात्री उशिरा याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.

Tags: hemant dhomehindi languagehindi third language controversy
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Dipika On Son Ruhaan

"कॅन्सर सर्जरीदरम्यान रुहानला स्तनपान करण्यापासून रोखणं होतं कठीण", दीपिका कक्करचा खुलासा, म्हणाली, "अनेक रात्री…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.