मराठी नाटक, चित्रपट, मालिका आणि वेबसीरिज अशा चारही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. प्रिया बापट ही अभिनेत्री, निर्माती असण्याबरोबरच गायिकाही आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण अभिनेत्रीने अनेकदा तिच्या गाण्याची व गाणं गाण्याच्या चुणूक दाखवली आहे., तिने ‘सारेगमप’ सारख्या शोचे सूत्रसंचालनही केले आहे. तसंच तिने अनेकदा पुरस्कार सोहळ्यामध्येही गाणी गायली आहेत. इतकंच नव्हे तर प्रियाने तिच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकासाठीही गायन केले आहे. (Priya Bapat Singing In Indian Ocean Concert News)
प्रियाने गायलेली गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतात. सोशल मीडियावर प्रिया बापट गायलेल्या गाण्यांचे अनेक व्हिडीओ शेअर करताना दिसते आणि तिच्या या व्हिडीओला चाहत्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत असतो. अशातच तिने नुकत्याच एका गाण्याच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गायन केलं आणि याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसंच या व्हिडीओसह तिने तिच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओखालील कॅप्शनमध्ये एक स्वप्न जगल्याचे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
प्रियाने लाईव्ह कॉन्सर्टचा व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “ही जादुई संध्याकाळ मी कायम जपून ठेवेन. इंडियन ओशन कॉन्सर्ट (Indian Ocean concert) मध्ये लाइव्ह गाणे सादर करेन अशी कल्पनाही केली नव्हती. माझ्या कॉलेजच्या दिवसांपासून ज्या बँडचे मी कौतुक केले आहे, ज्यांचे संगीत मला आवडते आणि ते मी जगले आहे, त्यांनी माझे खूप प्रेमाने स्वागत केले. एकच ग्रीन रूम शेअर करणे, त्यांना बॅकस्टेजवर भेटणे आणि संगीताबद्दलचे प्रेम एकत्र साजरे करणे हे स्वप्नवत होते. त्यांच्याबरोबर त्या मंचावर उभे राहणे हा एक सन्मान होता, जो मी कधीही विसरणार नाही”.
आणखी वाचा – करण जोहरने स्वतःच्या रिलेशनशिपबद्दल केला खुलासा, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाला, “इतका सिंगल आहे की…”
यापुढे ती असं म्हणाली आहे की, “ज्या प्रकारे गर्दी नाचत होती, जल्लोष करत होती आणि आमच्याबरोबरीने गाणे गात होती ते पाहणे जादूई होते. त्यांचे संगीत ऐकत मोठे झालेले पालक आता त्यांच्या मुलांना त्यांची ओळख करुन देत आहेत. या सगळ्याचा साक्षीदार होणे खूप खास होते. मला माझे स्वप्न जगू दिल्याबद्दल आणि ३५ वर्षांपासून हृदयाला भिडलेल्या त्यांच्या अविश्वसनीय संगीताबद्दल मी या दिग्गजांची आभारी आहे. ती खरोखर आठवणीत ठेवावी अशी रात्र होती!”, या पोस्टसह तिने ‘इंडियन ओशन कॉन्सर्ट’ला टॅग करत धन्यवादही म्हटले आहे.