शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

२२ वर्षांपासून ‘करण अर्जुन’ फेम ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री गायब, दाऊदच्या शूटरबरोबर प्रेमात पडून करिअर उद्ध्वस्त झालं अन्…

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 27, 2024 | 10:49 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Karan Arjun movie fame bollywood actress Mamta Kulkarni missing from the entertainment industry for the past 22 years

‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री २२ वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रापासून आहे गायब, आता नेमकी कुठे आहे?

जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित होण्याचा ट्रेंड सध्या वाढत आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘वीर-झारा’, ‘कल हो ना हो’ या कलाकृतींना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आहे. याच पार्श्वभूमीवर राकेश रोशन दिग्दर्शित आणि ज्येष्ठ कलाकार राखी, अमरिश पुरी, तसंच शाहरुख खान, सलमान खान, काजोल, ममता कुलकर्णी यांच्या भूमिका असलेला ‘करण-अर्जुन’ हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला आहे. नव्वदच्या दशकात प्रदर्शित झालेल्या ‘करण-अर्जुन’ या चित्रपटातले संवाद व गाणी गाजली. चित्रपट प्रदर्शित होऊन आता ३० वर्षे झाली आहेत आणि पुन्हा प्रदर्शित झाल्याने तो चाहत्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहे. (Mamta Kulkarni Missing)

या चित्रपटात दिसणारे मुख्य कलाकार आजही सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. पण अभिनेते अमरीश पुरी यांचे २००५ मध्ये निधन झाले आणि अभिनेत्री ममता कुलकर्णी २००२ पासून बॉलिवूडमधून गायब आहे. ममताचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट ‘कभी तुम कभी हम’ होता. म्हणजे ममता इंडस्ट्रीतून गायब होऊन जवळपास २२ वर्षे उलटून गेली आहेत. अलीकडेच चित्रपटाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या सेलिब्रेशनला ‘फिल्म बीट’शी झालेल्या संभाषणात राकेश रोशन यांनी अमरीश पुरीची आठवण येत असल्याचे सांगितले.

View this post on Instagram

A post shared by Rakesh Roshan (@rakesh_roshan9)

आणखी वाचा – करण जोहरचा स्वतःच्या रिलेशनशिपबद्दल खुलासा, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाला, “मी सिंगल आहे पण…”

यावेळी राकेश रोशन म्हणाले की, “पुरी यांना या सोहळ्याचा भाग बनून खूप आनंद झाला असता. परंतु दुर्दैवाने ते आता आमच्यात नाहीत”. यावेळी राकेश रोशन यांना ममता कुलकर्णीबद्दल विचारले असता, ते म्हणाले की, “कदाचित तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्याची माहिती मिळाली असावी. पण मी आता तिच्या संपर्कात नाही आणि ती आता कुठे आहे हेही मला माहीत नाही”.

आणखी वाचा – लोकप्रिय बँडमध्ये प्रिया बापटने गायल गाणं, स्वप्न पूर्ण झाल्याची भावनाही केली व्यक्त, म्हणाली, “३५ वर्षांपासून…”

अभिनेत्री ममता कुलकर्णी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, एक काळ असा होता जेव्हा ममता प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी होती. दाऊदच्या शुटरसोबत असलेल्या नात्यामुळे अभिनेत्रीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. ‘आशिक आवारा’, ‘क्रांतिवीर’, ‘वक़्त हमारा है’, ‘करण अर्जुन’ आणि ‘चाइना गेट’ यांसारख्या सिनेमांमध्ये अभिनेत्रूी झळकली. पण गेला अनेक काळ ती सिनेसृष्टीपासून लांब आहे.  

Tags: bollywood actressKaran Arjun Fame Mamta KulkarniMamta Kulkarni
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Aishwarya Narkar On Trolling

"तू म्हातारी झालीस हे स्वीकार", नेटकऱ्याने डिवचताच ऐश्वर्या नारकर भडकल्या, उत्तर देत म्हणाल्या, "वेळ येते…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.