बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या ‘तेजस’ चित्रपटामुळे बरीच चर्चेत येत आहे. गेल्या शुक्रवारी हा चित्रपट देशभरातील प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. तीनच दिवसांत चित्रपटाने केवळ ४ कोटींची कमाई केली. त्यामुळे अनेक ठिकाणी चित्रपटाचे अर्ध्याहून अधिक शोज रद्द झाले आहे. अशातच कंगनाने उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळासाठी लोकभवन येथे खास स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे या स्क्रिनिंगला उपस्थित राहिले होते. (Kangana Ranaut organised special Screening of ‘Tejas’ Movie)
कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या खास स्क्रिनिंगचे फोटोज शेअर केले. ज्यामध्ये योगी आदित्यनाथ कंगनाचा सत्कार करताना दिसले. तर दुसऱ्या फोटोमध्ये योगी आदित्यनाथ हे भावुक झालेले दिसले. हे फोटोज शेअर करताना ती म्हणाली, “आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी व उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासाठी एका सैनिकाच्या जीवनावर आधारित ‘तेजस’ चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते.”
हे देखील वाचा – प्रवीण तरडेंची मांजरही वापरते मोबाईल, बायकोने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाली, “पूर्ण एपिसोड…”
तुम्ही या पहिल्या फोटोमध्ये पाहू शकतात की, चित्रपटाच्या “एक सोल्जर क्या चाहता है” हा मोनोलॉग बघताना त्यांना अश्रू आवरता आले नाही. आपल्या सैनिकांचे धैर्य, शौर्य आणि देशाप्रती त्याग पाहून महाराज जी अत्यंत भावुक झाले. धन्यवाद महाराज जी, तुमचे कौतुक आणि आशीर्वादाने आम्ही भारावून गेलो आहोत.”, असं ती या पोस्टमध्ये म्हणाली.
हे देखील वाचा – खायला पैसे नव्हते, १८व्या वर्षी घर सोडलं अन्…; अंकिता लोखंडेचा ‘बिग बॉस’च्या घरात खुलासा, म्हणाली, “आई वडिलांना लोक खूप बोलायचे आणि…”
दरम्यान, कंगनाच्या या चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास, ६० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत केवळ ४ कोटींची कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने केवळ १.२५ कोटींची कमाई केली होती. तर, तीन दिवसात केवळ ३.७५ कोटींची कमाई केली होती. सोमवारी मात्र चित्रपटाला फारशी गर्दी नसल्यामुळे अनेक शोज रद्द झाले होते. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी कंगनाने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्याचा चित्रपटावर फारसा परिणाम पडला नाही.