टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंत अनेक काळकरांनी मजल मारली आहे. लहान पडद्यावरुन मोठ्या पडद्यावर आपले अस्तित्त्व निर्माण करणाऱ्या अभिनेत्रीमध्ये तनाज इराणी. लहान पडद्यावर चांगले नाव कमावल्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तसेच तिने हृतिक रोशन, अभिषेक बच्चन अशा बड्या कलाकारांबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण काही कारणांमुळे तिची परिस्थिति बदलली आणि ती चित्रपटसृष्टीपासून दूर झालेली पाहायला मिळाली. तनाजबरोबर नक्की काय घडलं हे जाणून घेऊया. (actress tanaaz irani)
तनाजने टेलिव्हिजनवरील ‘जुबान सांभाल के’ या शोमधून अभिनय करण्यास सुरुवात केली. या शोमुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिला इतर मालिकांमध्ये काम मिळण्यास सुरुवात झाली. मालिकांमधून प्रसिद्धी मिळाल्यानंतर तिचे नशीब बदलले आणि मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली.
एका पार्टीमध्ये गेली असताना तिची भेट राकेश रोशन यांच्याशी झाली. तेव्हा त्यांनी तिला ‘कहो ना प्यार है’ चित्रपटासाठी ऑफर दिली. या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर तिने ‘मै प्रेम की दिवानी हू’ व ’36 चायना टाऊन’ या चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली. पण नंतर तिच्याबरोबर एक भयंकर घटना घडली ज्यामुळे ती चित्रपटसृष्टीपासून दूर गेली. याबद्दलचा खुलासा तिने स्वतः एका मुलाखतीदरम्यान केला.
तनाजने सांगितले की, “अधिक काळ ऊंच हिल्स घालून काम केल्याने मला L4 व L5 स्लिप डिस्कची समस्या झाली. कालांतराने माझे हे दुखणे खूप वाढले आणि मला चालण्यामध्ये समस्या येऊ लागल्या. कामापासून दूर झाल्याने मी माझा सगळा आत्मविश्वास गमावला आणि मला नैराश्य आले. पण हळू हळू मी त्यातून बरी होऊ लागले”. पुढे ती म्हणाली की, “त्यानंतर मी शस्त्रक्रिया केली. त्यामुळे माझ्या पाठीचं दुखणं कमी झालं पण माझ्या पायमध्ये समस्या आली”.
तिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर तिने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी फरीद करीमबरोबर लग्न केले. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर काही वर्षांनी तिची भेट बख्तियार इराणीबरोबर झाली. दोघांमध्ये आधी मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी लग्न केले. ती आता 3 मुलांची आई असून तिच्या खासगी आयुष्यात खूप खुश आहे. सध्या अभिनयापासून दूर असली तरीही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.