‘झी मराठी’ वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. या मालिकाविश्वातील नुकतीच ‘पारू’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. मालिकेत पारूच्या भूमिकेत शरयू सोनावणे पाहायला मिळत आहे. तर प्रसाद जवादे आदित्य ही मुख्य भूमिका साकारत आहे. सध्या मालिकेचं चित्रीकरण हे सातारा येथे सुरु असलेलं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मालिकेच्या चित्रीकरणानिमित्त कलाकार मंडळी घरापासून दुर राहून त्यांच्या कामाला प्राधान्य देत आहेत. (Paaru Serial Set Visit)
मालिकेत पारू या मालिकेच्या भव्य अशा राजेशाही थाटमाट असलेला बंगला पाहायला मिळत आहे. या भव्य अशा ‘पारू’ मालिकेच्या सेटची झलक ‘इट्स मज्जा’च्या युट्युब चॅनेल वरून पाहायला मिळत आहे. मालिकेत जसा हा भव्य सेट पाहायला मिळतो, अगदी तितकंच भव्य असं याचं रुप आहे. किर्लोस्कर आडनावाची अशी मोठी पाटी या बंगल्याच्या मुख्य द्वारापाशी असलेली पाहायला मिळते. शिवाय किर्लोस्करांच्या घराबाहेर असणार मोठं अंगणही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. घराबाहेर असलेली बाग, झाडं या घराची त्या अंगणाची शोभा वाढवत आहेत.
इतकंच नव्हे तर बंगल्याच्या आवारात खूप मोठं असं स्विमिंग पूलही पाहायला मिळत आहे. बंगल्याच्या अवती-झाडं-झुडूप, डोंगर पाहायला मिळत आहेत. निसर्गाच्या कुशीत असलेला हा किर्लोस्कर बंगला भव्य आणि लक्षवेधी आहे. घराच्या आत सुंदर असं आकर्षक इंटेरिअर पाहायला मिळत आहे. घरात असलेल्या आकर्षक अशा झुंबराने घराची शोभा अधिक वाढली आहे.
सध्या मालिकेत पारूच्या लग्नाची घाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. तर एकीकडे प्रीतम व दिशाच्या साखरपुड्याची लगबग सुरु आहे. पारूसाठी आलेलं स्थळ हे बोगस असतं, त्या मुलाला दिशाने पाठवलेलं असतं, आता दिशाने टाकलेल्या या डावात पारू अडकणार का?, की पारूची यातून सुटका होणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.