मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना पाहायला मिळत आहे. अशातच आता मालिकाविश्वातील आणखी एक अभिनेता लग्नबंधनात अडकला आहे. सध्या या अभिनेत्याच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हेतर सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळीही या अभिनेत्याच्या विवाहसोहळ्याला उपस्थित होते. हा अभिनेता म्हणजे कौस्तुभ दिवाण. कौस्तुभने कीर्ती कदम हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. (kaustubh diwan marriage)
सध्या कौस्तुभ व कीर्ती यांच्या शाही विवाहसोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कौस्तुभने कीर्तीसह सप्तपदी घेत त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. कौस्तुभ व कीर्तीच्या लग्नाला अभिनेता आस्ताद काळे, त्याची पत्नी स्वप्नाली पाटील, मेघा धाडे, शिल्पा नवलकर, राजन ताम्हणे, अभिजीत केळकर या मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. या कलाकारंनी त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा – दिव्यांका त्रिपाठीचा मोठा अपघात, गंभीर दुखापतीनंतर सर्जरीही होणार, नेमकं काय घडलं?
कौस्तुभ व कीर्ती यांचा त्यांच्या लग्नातील पारंपरिक अंदाज लक्षवेधी ठरत आहे. अगदी मराठमोळ्या परंपरेत दोघांनी लग्नगाठ बांधली. यावेळी कौस्तुभने ऑफ व्हाइट रंगाचा कुर्ता आणि केशरी रंगाचं धोतर परिधान केलं होतं. तसेच पिवळ्या रंगाचा फेटा घातला होता. तर कीर्तीने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तर दोघांचा रिसेप्शन लूकही चर्चेत राहिला. रिसेप्शनसाठी कौस्तुभने भरजरी शेरवानी परिधान केली होती तर त्याच्या बायकोने लेहेंगा परिधान केला होता.

आस्ताद, स्वप्नाली, मेघा, शाल्मली टोळ्ये, शिल्पा नवलकर, राजन ताम्हणे या कलाकारंनी मिळून गेल्या महिन्यात कौस्तुभच केळवण केलं होतं. कौस्तुभला ‘जुळून येती रेशीमगाठ’ या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील त्याची आदित्य नगरकरची भूमिका विशेष चर्चेत राहिली. याशिवाय कौस्तुभने ‘बंध रेशमाचे’, ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’, ‘तुजं माजं सपान’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.