सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नेत्राने वध करुनही पुन्हा विरोचकाने अस्तिका म्हटल्यावर दिसला नाग, रुपालीला दक्षिण दिशेला बोलावणं, देवी आईच्या लेकी पुढे काय करणार?

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 19, 2024 | 12:09 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi new promo twist see the details

नेत्राने वध करुनही पुन्हा विरोचकाने अस्तिका म्हटल्यावर दिसला नाग, रुपालीला दक्षिण दिशेला बोलावणं, देवी आईच्या लेकी पुढे काय करणार?

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. गेले काही दिवस मालिकेतील अनेक ट्विस्टमुळे मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका बनत चालली आहे. या मालिकेचे कथानक त्रिनयना व विरोचक यांच्यातील युद्धावर आधारित आहे. त्यामुळे मालिकेतील अनेक ट्विस्टमुळे व खिळवून ठेवणाऱ्या कथानकामुळे ही मालिका बघण्याचा प्रेक्षकांचा कल वाढत आहे. अशातच मालिकेत नेत्राने अस्तिकाचा अंत केला असल्याचे पाहायला मिळाले.

अस्तिकानंतर नेत्राने विरोचकाचादेखील वध केला. काही दिवसांपूर्वी आलेल्या एका प्रोमोमध्ये विरोचक अद्वैतचा गळा पकडत त्याला मारण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा अद्वैतचा जीव वाचवण्यासाठी नेत्रा विरोचकाचा वध करते. मात्र, यामुळे विरोचकाचा अंत होत नाही. यानंतर विरोचक पुन्हा जीवंत होते आणि तिला दक्षिण दिशेकडे कुणीतरी बोलवतानाचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे ती दक्षिण दिशेकडे तिला बोलवणाऱ्या व्यक्तीच्या शोधात निघाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – शुभमंगल सावधान! ‘जुळून येती रेशीमगाठ’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न, मराठी कलाकारांची गर्दी

अशातच आता या मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये विरोचकाचा वध करणे हेच नेत्राचे अंतिम ध्येय असल्याचे म्हटले आहे. यामध्ये नेत्रा-अद्वैत एकमेकांशी विरोचकाविषयी बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे. यतावेळी नेत्रा अद्वैतला असं म्हणते की, “आता विरोचकाला मारल्याशिवाय मी अजिबात स्वस्त बसणार नाही. विरोचकाचा वध केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. यावर अद्वैतही तिला “विरोचक आता एकटा पडला असून तिच्यावर हल्ला करण्याची हीच योग्य वेळ आहे” असं तो म्हणतो.

आणखी वाचा – नीना गुप्ता होणार आजी, वयाच्या ३४ व्या वर्षी लेक मसाबा गरोदर, अभिनेत्री म्हणाली, “मुलांचे मूल…”

यापुढे मग पुन्हा नेत्रा त्याला असं म्हणते की, “विरोचकाकडे आता अस्तिका नाही पण तरी तिच्याकडे एक शक्ती आहे आणि आपल्याला त्या शक्तीविरुद्ध लढायचं आहे. अस्तिका गेल्यामुळे विरोचक आता काहीतरी मोठं घडवून आणणार आहे. त्यामुळे आता आपण तयार राहायला पाहिजे” असं म्हणते. त्यामुळे विरोचक आता काय घडवून आणणार? आणि नेत्रा-अद्वैत या विरोचकाच्या शक्तीविरुद्ध कसे लढणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यामुळे मालिकेचे प्रेक्षक आगामी भागांची आतुरतेने वाट पाहत आहेत.      

Tags: marathi entertainment newsmarathi serialSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Bigg Boss Marathi 6 Winner
Entertainment

‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ची विजेती ठरली तन्वी कोलते, ट्रॉफीसह मिळवली इतकी रक्कम, कौतुकाचा वर्षाव

एप्रिल 20, 2026 | 10:15 am
Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Next Post
Paaru Serial Promo

अहिल्यादेवींचा बदलता अवतार, साखरपुड्यामध्ये दिशाला पारुची माफी मागायला लावणार, आदित्य-प्रितमलाही बसणार धक्का

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.