छोट्या पडद्यावरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यातील अर्जुन आणि सायली यांची जोडी देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरते. तर या मालिकेत नुकतंच सायली आणि अर्जुन यांचं लग्न पार पडलंय. जुई गडकरी या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसतेय. मालिकेतील मिस गडबडगोंधळ असणारी जुई प्रेक्षकांची मनं जिंकतेय. (Jui Gadkari Post)
यासोबत ती सोशल मीडियावर देखील कमलाईची सक्रिय असलेली पाहायला मिळते.ती सोशल मीडियावर सेटवरील अनेक Bts व्हिडीओ शेअर करते, अशातच जुईची एक फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये जुईने ठरलं तर मग मालिकेतील कास्ट अँड क्रू मेंबर्सचे आभार व्यक्त केलेत.
पहा जुईने पोस्ट शेअर काय म्हटलंय (Jui Gadkari Post)
जुईने पोस्ट शेअर करत लिहिलंय, आज आमच्या “ठरलं तर मग” चे १०० भाग पुर्ण होत आहेत!!!
तो पहिला call आज खुप आठवतोय!! त्या एका कॅाल ने माझं लाईफ चेंज केलं!!! गेल्या जुलैला मी सोहम प्रॅाडक्शन्स चा भाग झाले!! आणि आज माझी ही फॅमिली १०० भागांची झाली!!! मी आज फक्त आणि फक्तं आभार मानते त्या सगळ्यांचे ज्यांनी विश्वास ठेऊन जुई ला “सायली” दिली!!! (Jui Gadkari Post)
हि मालिका माझ्यासाठी खुप जास्तं “close to my heart” आहे!! कारण एका मोठ्या आजारपणातुन बाहेर पडताना या मालिकेने मला आपलंसं केलं! आणि मी आज एक पुर्ण वेगळं लाईफ अनुभवतेय!! या सेट ची, crew ची Positivity ईतकी आहे की मला परत मागे वळुन बघायचंच नाहिये!! मी फक्तं ऋणी आहे त्या सगळ्यांची ज्यांनी माझी साथ कधीच सोडली नाही.. मला नेहेमी confidence दिला की मी करु शकेन! तुमचे आशिर्वाद शुभेच्छा नेहेमी पाठीशी असुद्या????????❤️ त्यातुनच मला ताकद मिळते रोज जोमाने काम करायची.
हे देखील वाचा – ‘आणि तिने मला रात्री ११ वाजता..’ असं म्हणत शिवने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव
जुई मागील दोन ते तीन वर्षांपासून अभिनयक्षेत्रापासून दूर राहिली होती. तिने ‘पुढचं पाऊल’, ‘सरस्वती’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली. या शिवाय ‘बिग बॉस मराठी’ या बहुचर्चित कार्यक्रमामध्ये ही सहभागी झाली होती.