बिग बॉस १६ च्या ट्रॉफीवर पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनने जरी नाव कोरले असले, तरी प्रेक्षकांच्या मनात खरा विजेता हा ‘आपला माणूस शिव ठाकरे’च आहे. बिग बॉस चा यंदाचा मानकरी शिव ठाकरे न झाल्याने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी नाराजगी दर्शविणाऱ्या अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. दरम्यान फक्त शिवच्या चाहत्यांमध्येच नव्हे तर हिंदी आणि मराठी मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटींमध्येही शिवची क्रेझ पाहायला मिळाली. (Shiv Thakare)
आपला माणूस म्हणत शिवने प्रेक्षकांसोबतच कलाकारांच्या मनावरही अधिराज्य गाजवले. बिग बॉसच्या ट्रॉफीपासून अवघे एक पाऊल दूर राहिलेल्या शिवने दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानले आणि विजेता ठरलेल्या एम सी स्टॅनच्या आनंदात सहभाग घेतला. शिवच्या मनाचा मोठेपणा हा प्रेक्षकांना अधिक भावला.
पहा काय म्हणाला शिव ठाकरे (Shiv Thakare)
नुकताच शिवने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत शिवने एका संवेदनशील विषयावर आपले विचार मांडले. दरम्यान शिव ने मनोरंजन विश्वातील कास्टिंग काउचचा त्याला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल भाष्य केलंय. त्याने सांगितलं की, “चार बंगल्यात एक मॅडम होत्या. ती मला म्हणायची, ‘मैने इसको बनाया है, मैने उसे बनाया है’. ती मला रात्री ११ वाजता ऑडिशनसाठी बोलवत होती.

इतका भोला तर मी नाहीय की रात्री काय ऑडिशन होतात हे मला समजत नाही. तर, त्यावेळी मी तिला म्हणालो की, मला काही काम आहे त्यामुळे मी येऊ शकत नाही. यावर ती म्हणाली, ‘काम नही करना?’ ‘इंडस्ट्रीत काम मिळणार नाही’ आणि अशा इतर गोष्टीही ती बोलली.असं बोलून तिने डिमोटिव्हेट करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा मला कधीच त्रास झाला नाही आणि होणार नाही.”(Shiv Thakare)
हे देखील वाचा – ट्रेडिंग गाण्यावर गरबा केल्याने रेश्मा शिंदे झाली ट्रोल
या मुलाखतीदरम्यान शिव पुढे असेही म्हणाला की, अनेकांनी त्याला चांगल्या भूमिका साकारण्यास मदत करण्याचे आश्वासन ही दिले. तसेच आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न ही केला होता. शिवने पुढे म्हटलंय, “आपण जर पात्रात बसत असू तर कोणीही त्या भूमिकेसाठी आपल्याला धक्का देऊ शकत नाही”.
शिवला आलेला हा अनुभव इंडस्ट्रीतल्या संवेदनशील विषयावर भाष्य करणारा होता. शिवने कायमच आपल्या चाहत्यांना भरभरून प्रेम दिलंय आणि चाहतेही त्याच्यावर प्रचंड प्रेम करतात.
