Devara Movie : ज्युनिअर एनटीआर, सैफ अली खान आणि जान्हवी कपूर यांसारख्या तगड्या कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेला ‘देवरा-१’ हा चित्रपट २७ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. ३०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली, मात्र ११ व्या दिवशी या चित्रपटाची कमाई घसरायला लागली. अशातच आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवरही येणार आहे. देवाराची ओटीटी प्रदर्शनाची बातमी समोर आली असून हा चित्रपट कोणत्या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार आहे हेदेखील सांगण्यात आले आहे. (Devara OTT Release)
अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, Netflix ने ‘देवरा-१’ चे ओटीटी अधिकार विकत घेतले आहेत. व्हरायटीच्या अहवालानुसार, ज्युनियर एनटीआर स्टारर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर Netflix वर पाहता येईल. मात्र निर्मात्यांनी अद्याप ‘देवरा-१’च्या प्रदर्शनाची ची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. परंतु ते नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये Netflix वर प्रवाहित होण्याची शक्यता आहे. Sacnilk रिपोर्टनुसार, चित्रपटाने आतापर्यंत सर्व भाषांमध्ये एकूण २४८.६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. जगभरात ३७० कोटी रुपये कमावले.
‘देवरा’मध्ये ज्युनियर एनटीआरने वडील देवरा आणि मुलगा वर्धा यांची दुहेरी भूमिका साकारली आहे. चित्रपटात जान्हवी कपूरने थंगमची भूमिका साकारली आहे, जी वर्धाची मैत्रीण आहे. देवरामध्ये सैफ अली खानने मुख्य खलनायक भैराची भूमिका साकारली आहे. ‘देवरा-१’चे दिग्दर्शन कोरटाला शिवा यांनी केले आहे, जे त्यांच्या अनेक यशस्वी चित्रपटांसाठी ओळखले जातात. या चित्रपटात प्रकाश राज, श्रीकांत, मुरली शर्मा, श्रुती मराठे, नारायण यांच्या भूमिका आहेत. ज्युनियर एनटीआर दुहेरी भूमिकेत आहे.
आणखी वाचा – निक्की तांबोळी व अरबाज खानची घराबाहेर आल्यानंतर पहिली भेट, शेअर केला सेल्फी, आईच्या विरोधानंतरही नातं कायम
दरम्यान,’देवरा-१’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, चार दिवसांत देशातील सर्व भाषांमध्ये १७३.१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तेलुगूमध्ये ‘देवरा’ने १३६.५ कोटींचा व्यवसाय केला आहे. तर हिंदीत चित्रपटाने ३१ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने जगभरात ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्यानंतर आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवरही येणार आहे.