गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

निक्की तांबोळी व अरबाज खानची घराबाहेर आल्यानंतर पहिली भेट, शेअर केला सेल्फी, आईच्या विरोधानंतरही नातं कायम

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 8, 2024 | 1:31 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 fame Nikki Tamboli and Arbaz Patel met after the show end and they shared the photo on social media

Bigg Boss Marathi 5 संपल्यानंतर निक्की व अरबाज यांनी घेतली भेट, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांची कोणत्या ना कोणत्या कारणावरून सातत्याने चर्चा रंगलेली दिसते. जेव्हा हे स्पर्धक शोचा भाग असतात, त्यावेळी बिग बॉसने दिलेले टास्क, वादविवाद, भांडणे, इतर स्पर्धकांशी असलेली समीकरणे यांमुळे हे स्पर्धक चर्चेचा भाग बनतात. तर, शोमधून बाहेर पडल्यानंतर या स्पर्धकांच्या नावांच्या अनेक चर्चा होताना दिसतात. ‘बिग बॉस मराठी ५’ मध्ये अनेक स्पर्धकांपैकी निक्की व अरबाज या दोन स्पर्धकांची चांगलीच चर्चा रंगली होती. अरबाज कमिटेड असल्याचे सांगूनही निक्की व अरबाजमध्ये कायमच मैत्रीचे नाते पाहायला मिळाले. (Bigg Boss Marathi 5 Nikki and Arbaz)

काही दिवसांपूर्वी अरबाजने घरात प्रवेश केला होता. तेव्हा अरबाज निक्कीला उचलून घेऊन आता बेडरूममध्ये गेला आणि तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने माझं जे काही होतं ते सगळं मी बाहेर जाऊन संपवलेलं आहे. माझे काही असंख्य अफेअर्स वगैरे नाहीत” असं म्हटलं. यावेळी निक्कीनेही अरबाजबद्दलच्या नात्याची कबुली दिली होती. निक्कीने असं म्हटलं होतं की, “मी आता एक निर्णय घेत आहे की मला आता तूच पाहिजे”. यामुळे दोघांच्या नात्याबद्दलच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या.

View this post on Instagram

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi चे विजेते होताच सूरज-अभिजीत गणपती चरणी, सिद्धीविनायकाचे घेतलं दर्शन, ‘त्या’ कृतीचे होतंय कौतुक

अशातच आता ‘बिग बॉस मराठी’ संपल्यानंतर या दोघांनी एकमेकांची भेट घेतली असून या भेटीचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्यांच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसादही दिला आहे. नेटकऱ्यांनी या जोडीचे कौतुक केलं असून अनेकांनी दोघांना एकत्र यावे असंही म्हटलं आहे. त्याचबरोबर अनेकांनी निक्की ‘बिग बॉस मराठी’ची विजेती व्हावी अशा अनेक कमेंट्सदेखील केल्या आहेत.

आणखी वाचा – “झापुक झुपूक काम आणि…”, सूरज चव्हाणचं आर्याने केलं भरभरुन कौतुक, म्हणाली, “माझ्या भावाने…”

दरम्यान,  ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अरबाज व निक्कीमध्ये मैत्रीपलीकडच्या नात्याचे वारे वाहत होते. ‘बिग बॉस’च्या घरात अरबाज निक्कीसाठी अनेकदा भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. तसंच तो तिच्यासाठी अनेकदा आक्रमकही झाला. अरबाजने घरातून निरोप घेतला होता, तेव्हा निक्की पूर्णत: कोलमडून गेली होती. पण आता यांच्यात पुन्हा सूत जुळल्याचे पाहायला मिळत आहे.    

Tags: Arbaz Patelbigg boss marathi 5nikki tamboli
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
kareena kapoor on sita mata

रामायणामधील सीताबरोबर करीना कपूरने केली स्वतःची तुलना, 'त्या' वक्तव्यावरुन भडकले प्रेक्षक, म्हणाले, "पटौदी कुटुंबाची सून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.