गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अंकिता वालावलकर होणाऱ्या नवऱ्याची सगळ्यांना ओळख करुन देणार, तारीखही ठरली, ‘त्या’ व्यक्तीच्या नावाची चर्चा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 8, 2024 | 5:25 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ankita Prabhu Walawalkar Boyfriend

कोकण हार्टेड गर्लने स्वतःच केला खुलासा

Ankita Prabhu Walawalkar Boyfriend : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ हे पर्व जरी संपलं असलं तरी यंदाच्या या पर्वाची सर्वत्र क्रेझ असलेली पाहायला मिळत आहे. यंदाच्या या पर्वाच्या विजेतेपदाचा बहुमान सूरज चव्हाणने पटकावला तर अभिजीत सावंत हा रनर अप ठरला. वादग्रस्त शोपैकी एक असलेल्या या लोकप्रिय शोने यंदाचं हे पर्व विशेष गाजवलं. यंदाच्या या पर्वात कलाकार मंडळींसह गायक, रील स्टार, रॅपर, नेते मंडळी यांना देखील खूप मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला. या पर्वात सगळेच स्पर्धक धुमाकूळ घालताना दिसले. यंदाच्या या पर्वात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची हवा पाहायला मिळाली. हे पर्व संंपल्यानंतर प्रत्येक स्पर्धकाचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत आले आहे.

या पर्वामध्ये फायनलिस्ट ठरलेल्या अंकिता प्रभू वालावलकरचे वैयक्तिक आयुष्य विशेष चर्चेत आहे, कारण या कोकण हार्टेड गर्लने ‘बिग बॉस’च्या घरात जाण्यापूर्वी तिच्या आयुष्यात ‘कोकण हार्टेड बॉय’ असल्याचे सांगितले होते. मात्र अंकिताने तिचा बॉयफ्रेंड नक्की कोण आहे याबाबतचा खुलासा केला नाही. त्यामुळे कोकणहार्टेड बॉय नेमका कोण आहे हा प्रश्न साऱ्यांना पडला. आता लवकरच या प्रश्नाचे उत्तर मिळणार असून या चर्चांना लवकरच पूर्णविराम मिळणार आहे.

आणखी वाचा – “कोणतीही अपेक्षा करणं चुकीचं आणि…”, अंकिताबरोबरच्या नात्यावर डीपीचं स्पष्टीकरण, म्हणाला, “बहीण मानंल आहे आता…”

यापूर्वी अंकिता व ओंकार भोजने यांचेही नाव जोडले गेले होते, मात्र ही अफवा स्वत: अंकिताने एका मुलाखतीत नाकारली होती. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर आल्यानंतर अंकिताने ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत तिचा बॉयफ्रेंड हा मनोरंजन क्षेत्रात असल्याचा खुलासा तिने केला. यानंतर आता अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये तिच्या चाहत्याने, “तुझा घो कोण आहे हे आता सांग. ‘बिग बॉस’ झालं आहे. मी खूप उत्सुक आहे”, असं म्हटलं आहे. यावर अंकिताने उत्तर देत, “१२ ऑक्टोबर”, असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – “त्याला कमी लेखलं नाही”, सूरज चव्हाणबाबत बोलल्यानंतर मराठी अभिनेत्याचा युटर्न, म्हणाला, “मीही शेतकऱ्याचा मुलगा माझा बाप…”

याशिवाय अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या एका पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट हाच तो मुलगा असल्याचं म्हटलं. अंकिताची ही पोस्ट संगीत दिग्दर्शक कुणाल भगत बरोबरची आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत, “हाच सिक्रेट बॉयफ्रेंड आहे कळलं”, “गीतकार सिक्रेट बॉयफ्रेंड हाच आहे तर”, असं म्हटलं आहे. कुणाल एक संगीत दिग्दर्शक असून तो आणि अंकिता खरोखर डेट करतायंत का हे येत्या दसऱ्याला समजणार आहे.

Tags: Ankita Prabhu walawalkarAnkita Prabhu Walawalkar Boyfriendbigg boss marathi season 5
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
70th National Film Awards 2024| 70th National Film Awards 2024 Full Winner List

National Film Awards 2024 : मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, हिंदीसह साऊथ चित्रपटांची बाजी, वाचा संपूर्ण यादी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.