बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुझे हिप्स लपवून ठेव, तुझा आकार…”, कुटुंबाकडूनच जॉनी लिवर यांच्या लेकीला वेगळेच सल्ले, म्हणाली, “आकार कमी करण्यासाठी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 26, 2025 | 3:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Jamie lever on body shaming

“तुझे हिप्स लपवून ठेव, तुझा आकार...”, कुटुंबाकडूनच जॉनी लिवर यांच्या लेकीला वेगळेच सल्ले, म्हणाली, “आकार कमी करण्यासाठी...”

स्टारकिड्सला इंडस्ट्रीमध्ये सहज काम मिळतं हे सहसा उघडपणे कित्येक कलाकारांकडूनही बोललं जातं. मात्र काही स्टारकिड्सच्या बाबतीत सत्य परिस्थिती काही वेगळीच आहे. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे जॉनी लिवर यांची लेक जेमी लिवर. जेमीला इंडस्ट्रीने लगेचच स्वीकारलं नाही. वडील सुपरस्टार असतानाही तिला कामासाठी स्ट्रगल हा करावाच लागला. लूकवरुनही जेमीला बरंच डिवचण्यात आलं. वाढतं वजन, शरीराचा आकार याविषयी कुटुंबातल्या व्यक्तींनीही बरेच सल्ले दिले. मात्र प्रत्येक नकारात्मक गोष्टींवर मात करत तिने स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं. यासाठी मेहनत घेतली. जेमीने आता याबाबत उघडपणे भाष्य केलं आहे. (Jamie lever on body shaming)

मध्यंतरी हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत जेमीने तिच्या शरीराच्या आकाराबाबत, ट्रोलिंगबाबत भाष्य केलं. जेमी म्हणाली, “जन्मापासूनच माझ्या शरीराचा आकार वेगळा होता. वेगळा म्हणण्यापेक्षा वाढलेलं वजन होतं. आणि पटकन समोरच्या व्यक्तीची नजर जाण्यासारखा शरीराचा आकार होता. वजन कमी करण्याचा माझा प्रवास खूप मोठा होता. आयुष्यातील एक काळ असा होता की, मला गुडघ्यापर्यंत शरीर झाकण्याचा सल्ला दिला जायचा. लांब कुर्ता, टिशर्टही लांब, शर्टही मोठं मी घालायचे. मला सगळेच म्हणजे कुटुंबातीलही प्रत्येकजण बोलायचे की, हिप्स तुझे इतके मोठे आहेत ते लपवूनच ठेव”.

आणखी वाचा – “मेकअप करुन अन्नपूर्णांच्या मध्येच जबरदस्ती घुसून…”, आषाढी वारीवरुन शुभांगी गोखलेंची पोस्ट, नेटकऱ्यांनीही दिला पाठिंबा

View this post on Instagram

A post shared by Jamie Lever (@its_jamielever)

“तुला काहीतरी करावं लागेल, ते कमी करावे लागतील, काहीतरी तू करच असं सतत बोललं जायचं. मला खूप बोललं जायचं. ज्यामुळे मी माझ्यावरच प्रेम करत नव्हते. पण कालांतराने माझ्यामध्ये काही बदल झाले. कॉमेडी करत असताना तुम्हाला बिनधास्त राहावं लागतं. बेधडक बोलावं लागतं. निर्लज्जही व्हावं लागतं. शरीर माझं जसं आहे तसं मी स्वीकारलं. स्वतःला समजावलं. त्यानंतर मी माझ्या शारीरिक आरोग्याकडे थोडं लक्ष दिलं. त्यानंतर वजन कमी करण्याचा निर्णय मी घेतला. खूप वजन कमी केलं”.

आणखी वाचा – ४१ वर्षांनी अंतराळात पोहोचला शुभांशु शुक्ला, लेकाची कर्तबगारी पाहून आईला रडू अनावर, वडीलही भावुक झाले अन्…

“आपल्या इंडस्ट्रीमध्ये वजन कमी करावंच लागेल हेही मला वाटत होता. माझ्या आईला जेवढी इंडस्ट्री समजते त्यावरुन तिही मला म्हणाली की, बेटा तुला वजन कमी करावंच लागेल. नाहीतर ते तुला वेगळ्याच कॅटेगरीमध्ये टाकतील. वजन कमी करायला सुरुवात केल्यानंतर मी असा विचार केला की, माझं शरीर आहे तर ते मी का दाखवू नये?. मी वर्कआऊट करतानाचे फोटो व व्हिडीओ टाकू लागले. समाज असा आहे की, कोणी तुमच्याकडे चांगल्या तर कोणी वाईट नजरेने बघणार. त्याच्यावर तुम्ही नियंत्रण ठेऊ शकत नाही. काळी आहे, चुडैल वाटते, चुडैल सारखीच वागते, खराब दिसते, तुला काम नाही मिळणार, तू मरत का नाहीस? अशा अनेक कमेंट्सही मला आल्या”. जॉनी लिव्हर यांच्या लेकीने सगळ्या संकटांवर, टीकांवर मात करत कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे.

Tags: bollywood newsentertainment newsjohny lever
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
prada kolhapuri chappal controversy

"कोल्हापुरीच चप्पल म्हणा", परदेशात फॅशनशोमध्ये कोल्हापुरी चप्पल घालून मिरवलं, मात्र दिलं वेगळंच नाव, कलाकारही भडकले

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.