बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कोल्हापुरीच चप्पल म्हणा”, परदेशात फॅशनशोमध्ये कोल्हापुरी चप्पल घालून मिरवलं, मात्र दिलं वेगळंच नाव, कलाकारही भडकले

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 26, 2025 | 4:30 pm
in Social
Reading Time: 3 mins read
google-news
prada kolhapuri chappal controversy

"कोल्हापुरीच चप्पल म्हणा", परदेशात फॅशनशोमध्ये कोल्हापुरी चप्पल घालून मिरवलं, मात्र दिलं वेगळंच नाव, कलाकारही भडकले

prada kolhapuri chappal controversy : कोल्हापूरच्या कोल्हापुरी चपला या जगभरात प्रसिद्ध आहेत. कोल्हापूरची, आपल्या महाराष्ट्राची ओळख असलेल्या या चपलांनी आता विदेशात स्थान मिळवलं आहे. हो. दोन दिवसांपासून सतत कोल्हापुरी चपलांचा घवघवा परदेशात सुरु असल्याचं कानावर येत होतं. त्याचे व्हिडीओ, फोटो समोर येत होते, पण नेमकं हे प्रकरण काय आहे हे कळत नव्हतं. प्राडा जागतिक ब्रँडने इटली येथे आयोजित कार्यक्रमात ‘मेन स्प्रिंग समर २०२६’ कलेक्शन सादर केले. या कार्यक्रमात मॉडेलच्या पायातील चप्पल ही कोल्हापुरी होती. हे पाहताच या जगविख्यात कंपनीवर कोल्हापुरी चप्पल चोरी केल्याचा आरोप केला जात आहे. सुरुवातीला आपली महाराष्ट्राची ओळख परदेशात झळकली म्हणून कौतुक वाटत होतं. मात्र, कालांतराने यामागचं खरं कारण समोर आलं.

अभिमान वाटणारी गोष्टच चोरीला गेली?, असं वाटू लागलं. हो. प्राडाने आपल्या कोल्हापुरी चपलेला कोल्हापुरी चपला हा दर्जा न देता केवळ लेदर शूज असा उल्लेख केला. तपकिरी चामडे, पायाचा अंगठा, आणि तोच आकार असलेली आपली कोल्हापुरी चप्पल जेव्हा विदेशात झळकते तेव्हा छाती गर्वाने फुलून येते. मात्र, या सगळ्यात आपल्या ओळखीचा, आपल्या निर्मितीचा नामोनिशाणही दिसत नाही तेव्हा वाईट वाटतं. आपल्याकडे ५०० ते १५०० च्या भावात मिळणारी ही कोल्हापुरी चप्पल जेव्हा प्राडासारखा ब्रँड १ लाख ते १.२ लाख रुपयांमध्ये विकतो तेव्हा वाईट वाटतं.

आणखी वाचा – ४१ वर्षांनी अंतराळात पोहोचला शुभांशु शुक्ला, लेकाची कर्तबगारी पाहून आईला रडू अनावर, वडीलही भावुक झाले अन्…

View this post on Instagram

A post shared by Prada (@prada)

विदेशातील फॅशन शो पाहिल्यानंतर जेव्हा हा वाद चिघळला, त्यानंतर भारतीय नागरिक संताप व्यक्त करताना दिसले. इतकंच नाही तर अनेक मराठी कलाकार मंडळींनीही यावर आक्षेप घेत पोस्ट केली आहे. लेदर शूज असे न म्हणता याला कोल्हापुरी चप्पल असे नाव देण्यात यावे, आणि आपली कोल्हापूरची शान जगभरात चर्चेत यावी, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. शिवाय आपल्याला आपला दर्जा हा मिळायलाच हवा असं म्हणत केदार शिंदे, हेमल इंगळे, विदुला चौघुले, इंद्रनील कामत, इरिना रुडाकोवा, रसिका सुनील या कलाकार मंडळींनी आवाज उठविला आहे.

आणखी वाचा – अंकिता लोखंडे आई होणार?, भरकार्यक्रमात असं काही बोलून गेली की सगळे पाहतच बसले, म्हणाली, “मी धावू शकत नाही कारण…”

कोल्हापुरी चपला या आज प्रत्येकाचा दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. सणासुदीला पारंपरिक वेशभूषेत ही चप्पल आवर्जून घातली जाते. या चपलांना जीआय टॅग प्राप्त झाले असून याने सांस्कृतिक आणि प्रादेशिक महत्त्व अधोरेखित केले जात आहे. या चपलांचा इतिहास १२ व्या शतकाशी जोडलेला आहे. पारंपरिक हस्तकलेतून या चपला बनविण्यात आल्या आहेत.

Tags: kolhapuri chappal controversypradatrending topic
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Actor Died Horrific Death

सतत ताप, उलट्या आणि हृयविकाराचा झटका; 'कसौटी जिंदगी की' मालिकेतील अभिनेत्याचा झालेला धक्कादायक मृत्यू, एक काळ गाजवला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.