छोट्या पडद्यावरून मराठी मनोरंजन विश्वात आपलं स्थान निर्माण करणारी उर्मिला निंबाळकर हिची आज युट्युबवरील प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळख बनली आहे. तिचे स्वतःचे युट्युब चॅनेल असून या चॅनेलच्या माध्यमातून ती विविध वलॉग्स व व्हिडिओस शेअर करते. युट्युबवर येण्यापूर्वी तिने काही गाजलेल्या मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण ती जेव्हा एका गाजलेल्या मालिकेत काम करत होती, तेव्हा तिला अचानक काढून टाकण्यात आलं होतं. याचा खुलासा खुद्द तिने तिच्या युट्युब चॅनेलवर दिला आहे. (Urmila Nimbalkar says she was throw out from serial)
अभिनेत्री व युट्युबर असलेली उर्मिलाच्या युट्युब चॅनेलने नुकताच १ मिलियन सब्सक्राइबर्सचा टप्पा गाठला आहे. त्यानिमित्त तिने नुकताच एक व्हिडिओ अपलोड केला. ज्यात तिला आलेलं नैराश्य व तिच्या संपूर्ण प्रवासाबद्दल व्यक्त झाली आहे. उर्मिलाने छोट्या पडद्यावरील एका लोकप्रिय मालिकेत काम केलं आहे. मात्र त्याच मालिकेच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीला एक वेगळा अनुभव आला होता, ज्यामुळे ती फार नैराश्यात गेली होती. हा घडलेला प्रकार सांगताना उर्मिलाला अश्रू अनावर झाले होते.
उर्मिला याबद्दल बोलताना म्हणाली, “मला अजूनही आठवतंय, एके दिवशी मी मालिकेच्या सेटवर येऊन माझ्या मेकअप रूममध्ये गेले तर मला कोणी मेकअपच करेना. मेकअप दादा इकडे-तिकडे पळत होते. कोणीच माझ्याशी सेटवर नीट बोलत नव्हतं. काय सुरू आहे, काहीच कळत नव्हतं. मग प्रोडक्शन हाऊसमधून एक मुलगी आली आणि तिने सांगितलं की चॅनेलने निर्णय घेतला, की तुला काढून टाकण्यात आलं आहे. तेव्हा मला इतकं शून्य फिलिंग आलं की, म्हणजे मी खूप शून्य आहे, फेल्युअर आहे. मी त्यादिवशी मला असं झालं की, माझ्याहून शून्य किंमतीची व्यक्ती या जगामध्ये नाही. कारण, मी माझ्या आयुष्यातलं सगळं खर्ची केलं होतं. आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी गमावल्या होत्या. त्यादिवशी मी अगदी ढसाढसा रडले होते.”
हे देखील वाचा – प्रियांका चोप्राच्या जाऊबाईचा घटस्फोट होणार, लग्नाच्या चार वर्षांनंतर वेगळं होण्याचा निर्णय कारण…
“त्यानंतर एक गाडी आली, मला प्रोडक्शनच्या ऑफिसमध्ये नेलं. तेव्हा त्यांनी ‘तू सारखी आजारी पडतेस, तुझे हेल्थ इश्यू आहेत त्यामुळे तू स्वत:हून मालिका सोडते आहेस’, असं माझ्याकडून लिहून घेतलं. खरं सांगायचं तर, मला कळतं होतं पण मी तेव्हा इतकी दु:खात होते, डॉक्टर्स, हॉस्पिटल्स करून मी इतकी थकलेले होते. माझा आत्मविश्वास ढासळला, की लोक मला येऊन सतत काही ना काही बोलायचे.”, असं ती म्हणाली.
हे देखील वाचा – ‘रात्रीस खेळ चाले’च्या शेवंताने घेतलं नवं घर, सोशल मीडियावर पूजा करतानाचे फोटो व्हायरल
“आपलं शरीर आपल्याला सांगत असतं, की आपल्याबरोबर जर सगळ्या वाईट गोष्ट होत असतील तर ते सगळं बंद व्हावं. कदाचित हे माझ्यासाठी चांगलं असेल असा विचार करून मी त्यावर सह्या केल्या. मी कुणाशी भांडू पण नाही शकत जर मला काढलं असेल तर, त्यामुळे ठीक आहे. पण यात माझ्या खूप गोष्टी गेल्या, पैसे गेले, सही केली मी आणि खाली उतरले मी. आजही मी कोणाचं नाव घेऊ शकत नाही कारण मी त्यावर सही केली आहे. हे नंतर मी सगळीकडे टाकलं की, मी मालिका सोडली आहे. कोणालाच माहित नाही की मला काढून टाकण्यात आलं. त्यानंतर माझे सेटवर अधिक नखरे असायचे म्हणून मला काढलं, अशा चर्चा सुरु होत्या.”, असा धक्कादायक खुलासा तिने केला आहे.