शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तारक मेहता…’मध्ये मिसेस रोशनच्या भूमिकेत दिसणार नवी अभिनेत्री, जेनिफर मिस्त्रीचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, “ती माझ्या आधीपासूनच…”

अंकिता करगुटकरby अंकिता करगुटकर
डिसेंबर 7, 2023 | 12:09 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Jennifer mistry spoke about replacement of roshan

Jennifer mistry spoke about replacement of roshan

छोट्या पडद्यावरील विनोदी मालिकांमधील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. गेली अनेक वर्षे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आली आहे. विशेष म्हणजे मालिकेतील दयाबेन या पात्राने तर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.हे पात्र अभिनेत्री दिशा वकानी साकारत होती. पण त्यानंतर तिने मॅटर्निटी ब्रेक घेतला आणि पून्हा मालिकेत परतलीच नाही. त्यानंतर बऱ्याच कलाकारांनी एकामागोमाग ही मालिका विविध कारणांमुळे सोडली. रोशन सिंग सोधीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणारी जेनिफर मिस्त्रीनेही मालिकेचे निर्माते असित कुमार मोदींवर छेडछाडीचा आरोप करत ही मालिका सोडली होती. दरम्यान अशी बातमी समोर येत आहे की आता या भूमिकेसाठी निर्मात्यांनी अभिनेत्री मोनाज मेवावलाची निवड केली आहे. यापूर्वी हे पात्र अभिनेत्री जेनिफर मिस्त्री साकारत होती. नुकताच तिने याबाबत प्रतिक्रिया देत या भूमिकेबाबत वक्तव्य केलं. (Jennifer mistry spoke about replacement of roshan)

‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत जेनिफरने मोनाजबाबत वक्तव्य केलं.जेनिफर म्हणाली, “मोनाज खूप सुंदर मुलगी आहे. ती खूप हुशारही आहे. मी आशा करते आणि प्रार्थनाही करते की ती हे पात्र खूप छान साकारत पुढे जाईल. ती माझ्या आधीपासून या इंडस्ट्रीत काम करत आहे. पण तिला आजपर्यंत तिची ओळख मिळाली नव्हती. या कार्यक्रमातून व मिसेस रोशनच्या पात्रामुळे तिला योग्य ती प्रसिद्धी व ओळख मिळेल अशी मी आशा करते”.

View this post on Instagram

A post shared by Monaz Mevawalla (@monazmevawalla)

आणखी वाचा – “त्याची लायकी नाही”, गायक अभिजीत भट्टाचार्य यांचे सलमान खानबाबत धक्कादायक वक्तव्य म्हणाले, “पाकिस्तानसाठी प्रामाणिकपणा…”

पुढे जेनिफरने तिच्या रोशनच्या पात्राबद्दल सांगताना स्पष्ट केलं की, “मी रोशन या पात्राला माझ्या आयुष्यातून आता मुक्त केलं आहे. हे पात्र आणखी यशस्वी व्हावं अशीच मी प्रार्थना करते. या पात्रासाठी मोनाजची निवड झाल्याची बातमी कळली. त्यामुळे माझा विश्वास आता दृढ झाला आहे कारण मी त्यासाठी प्रार्थना केली होती”.

View this post on Instagram

A post shared by Jennifer Mistry Bansiwal????‍♀️♾ (@jennifer_mistry_bansiwal)

आणखी वाचा – अंथरुणाला खिळलेल्या बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्याला सचिन पिळगांवकरांना भेटायची इच्छा, अभिनेता घरी पोहोचला अन्…; म्हणाले, “मी भेटलो पण…”

पात्रासाठी दुसऱ्या व्यक्तीची निवड झाल्याचं विचारल्यानंतर जेनिफर म्हणाली, “या बातमीचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही. रोशनची भूमिका करण्याऱ्या व्यक्तिबाबत माझ्या मनात फक्त प्रेम आहे, मला हे देखील कळून आलं आहे की कार्यक्रमातील रोशनचं ऑनस्क्रीन कुटुंबदेखील माझ्यासारखंच त्रस्त होतं. त्यात फार सीन्स नव्हते. त्यामुळे आता यापुढे माझ्यासाठीही गोष्टी चांगल्या होतील आणि मी  यामुळे बरीच आनंद आहे”, असं सांगत तिने आपलं मत व्यक्त केलं.  

Tags: Jennifer Mistry Bansiwalreplacement of roshan singh sodhiroshan singh sodhiTaarak mehata ka ooltah chashamah
अंकिता करगुटकर

अंकिता करगुटकर

अंकिता करंगुटकर या इट्स मज्जा ऑनलाईनमध्ये रिपोर्ट पदावर कार्यरत आहे. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या घडामोडींच्या वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठामधून त्यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (एमएसीजे) ही पदवी मिळवली. विद्यापीठात शिकत असताना ‘जय महाराष्ट्र’मध्ये इंटर्नशीप केली. त्याचबरोबर ‘तरूण भारत, गोवा’ याठिकाणी तीन महिने काम केलं आहे. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Next Post
marathi actress snehal tarde shared marriage anniversary special video for her husband actor director pravin tarde

Video : बीचवर रोमँटिक डेट, घट्ट मिठी मारली अन्…; बायकोने दिलेलं सरप्राइज पाहून प्रवीण तरडेही भारावले, सुंदर व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.