हिंदी सिनेसृष्टीत एक काळ गाजवलेले लोकप्रिय अभिनेते म्हणजे ज्युनिअर महमूद. त्यांनी आपल्या अभिनयातून ९०च्या दशकापर्यंतचा काळ चांगलाच गाजवला. पण सध्या ते एका गंभीर आजाराशी झुंज देत असल्याचं समोर आलं आहे. त्यांना पोटाचा कर्करोग झाला असल्याचा नुकताच उघडा झाला. काही दिवसांपूर्वी अभिनेते जॉनी लिवर यांनी त्यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. यानंतर त्यांना हा गंभीर आजार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. या सगळ्यात ज्युनिअर महमूद यांचे जवळचे मित्र सलाम काझी यांनी खुलासा केला की त्यांना त्यांच्या बालपणीचे मित्र सचिन पिळगांवकर व जितेंद्र यांना भेटायचं आहे. यानंतर नुकतंच सचिन यांनी त्यांची भेट घेतली असल्याचं सांगत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. (Sachin pilgaonkar meet Bollywood actor junior mehmood)
गेल्या १५ वर्षांपासून सलाम काझी हे ज्युनिअर महमूद यांच्याबरोबर आहेत. त्यांनीच ‘ई टाइम्स’ला दिलेल्या वृत्तात ज्युनिअर महमूद यांना सचिन यांना भेटायचं असल्याचं सांगितलं होतं. सचिन यांना मॅसेज केला होता पण त्यांचा प्रतिसाद आला नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. पण नुकतीच सचिन पिळगावकर यांनी ज्युनिअर महमूद यांना भेट घेतली असल्याचं सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.
सचिन यांनी म्हटलं की, “माझे बालपणीचे मित्र ज्युनिअर महमूद गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराचा सामना करत आहेत. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी कृपया प्रार्थना करा. काही दिवसांपूर्वी मी त्यांच्याबरोबर व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. आज मी त्यांना भेटायला गेलो. पण वैद्यकीय उपचारांमुळे ते झोपले होते. मी त्यांचा मुलगा तसेच अभिनेते जॉनी लिव्हर यांच्या संपर्कात आहे. त्यांच्या आरोग्याविषयी जाणून घेत आहे. त्यांच्यावर देवाची सदैव कृपा असावी”, असं लिहीत सचिन यांनी ज्युनिअर यांना भेटायला गेले असल्याचं सांगितलं.
महमूद हे गेल्या दोन महिन्यांपासून आजारी असल्याचं सलान काझी यांनी स्पष्ट केलं. सुरुवातीला त्यांना हा किरकोळ आजार वाटला होता. पण अचनाक त्यांचं वजन कमी होऊ लागलं. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचे रिपोर्टस आल्यानंतर त्यांना फुफ्फुस व यकृतचा कॅन्सर झाला असल्याचं समोर आलं. त्यांना याआधी कावीळचाही त्रास झाला होता. त्यांच्यावर सध्या घरीच उपचार सुरु आहेत. त्यांचा कॅन्सर चौथ्या स्टेजवर पोहोचला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.