‘बाप’ हा प्रत्येक मुलाच्या आयुष्यातला सुपरहिरो असतो. त्या सुपरहिरोचं अस्तित्व हे प्रत्येक मुलासाठी महत्त्वाचं असतं. पण ते अस्तित्वचं एकेदिवशी नाहीसं झालं तर कोणताही माणूस अचानक कोलमडून पडतो. असंच काहीसं ‘बिग बॉस मराठी’ फेम जय दुधाणेबरोबर झालं. ‘बिग बॉस मराठी’मधून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता जय दुधाणे व त्याच्या कुटुंबियांवर काही दिवसांपूर्वी दु:खाचा डोंगर कोसळला. २४ जूनच्या मध्यरात्री कार्डियाक अरेस्टमुळे जयच्या वडिलांचे निधन झाले. माझा सुपरहिरो गमावला. ते फक्त आमच्या कुटुंबासाठीच नाही तर त्यांच्या ओळखीच्या प्रत्येकासाठी एक महत्त्वाची व्यक्ती होते” असं म्हणत जयने वाडिलांच्या निधनाची माहिती दिली होती. (Jay Dudhane Emotional Post)
२४ जून ते २४ ऑगस्ट, जयच्या वडिलांचे निधन होऊन आज दोन महिने पूर्ण झाले असून अभिनेता अजूनही वडिलांच्या अचानक निघून जाण्याच्या धक्क्यातून सावरलेला नाही. वडिलांच्या निधनाच्या दोन महिन्यांनंतरही त्याला वडिलांची आठवण येत आहे. याच आठवणीत जयने वडिलांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये जयने असं म्हटलं आहे की, “तुम्हाला जाऊन आज दोन महिने पूर्ण झाले आहेत. पण तुम्ही अगदी काल-परवाच आम्हाला सोडून गेलात की काय असं वाटत आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे बाबा, मला आशा आहे की, तुमचा नवीन प्रवास भारी असेल आणि मला तुमचा कायम अभिमान असेल”.
आणखी वाचा – “राखी सावंतला आणा तरच…”, Bigg Boss Marathi वरुन शशांक केतकरच्या बायकोचं वक्तव्य, म्हणाली, “कृपया…”
जयने सोशल मीडियावर वडिलांबद्दल खास पोस्ट करत ‘मी माझा सुपरहिरो गमावला’ असल्याची भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. या पोस्टमध्ये जयने आपल्या भावना व्यक्त करत “मी हे शेअर करेन असे कधी वाटले नव्हते. २४ जूनच्या मध्यरात्री कार्डियाक अरेस्टमुळे मी माझा सुपरहिरो गमावला. ते फक्त आमच्या कुटुंबासाठीच नाही तर त्यांच्या ओळखीच्या प्रत्येकासाठी एक महत्त्वाची व्यक्ती होते” असं म्हटलं होतं. अशातच वडिलांच्या निधनानंतर जयने पाहिल्यांदाच त्याच्या बाबांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आणखी वाचा – गणेशोत्सवात एकच गाणं वाजणार!, ‘बाप्पा आमचा आला’ लवकरच तुमच्या भेटीला, पोस्टर प्रदर्शित
दरम्यान, जयच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर जय स्टार प्रवाह वहिनीवरील येड लागलं प्रेमाचं या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. मात्र काही दिवसांपूर्वीच या मालिकेतून जयने अचानक एक्झिट घेतली आहे. “मी एक महिन्यापूर्वी माझे वडील गमावले. हे माझं आणि माझ्या कुटुंबाचं मोठं नुकसान आहे. अनेक वैयक्तिक कारणांमुळे मी स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेचा प्रवास सुरु ठेवू शकणार नाही” असं म्हटलं होतं.