विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. यानिमित्ताने सगळीकडे जल्लोष व आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या येण्याने सर्वत्र भक्तीभावाचे वातावरण असतं. त्यामुळे त्याच्या आगमनासाठी सर्वच उत्सुक असतात. बाप्पाच्या आगमनासाठी भाविक व भक्तगण आतुर आहेत. बाप्पाच्या येण्याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. बाप्पाच्या आगमनासाठी घरोघरी सजावट आणि रोषणाईची लगबग सुरु झाली आहे. या सगळ्याबरोबरच धूम असते ती भजन-संगीत आणि गाण्यांची… गणपती बाप्पांच्या आगमनासाठी भाविकांबरोबरच आता ‘आठवी-अ’चे कलाकारही सज्ज झाले आहेत. लवकरच ‘आठवी-अ’च्या बालकलाकारांचा बालगणेश येणार आहे आणि लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी ‘आठवी-अ’चे सर्व कलाकार वाट पाहत आहेत. (itsmajja bappa aamcha aala song)
‘इट्स मज्जा’च्या ‘आठवी-अ’ या वेबसीरिजने सर्वत्र धुमाकूळ घातला. ‘इट्स मज्जा’च्या ‘आठवी-अ’ या सीरिजला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. आभ्या व त्यांच्या खास मित्रांची साधीसोपी तरी प्रत्येकाला आपलीशी वाटणारी गोष्ट या ‘आठवी-अ’ सीरिजद्वारे सांगण्यात आली आणि या सीरिजला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. या सीरिजने प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले. ही सीरिज संपल्यानंतरदेखील अनेक चाहते मंडळी या सीरिजला व कलाकारांना मिस करत आहेत आणि चाहत्यांची ही इच्छा आता पूर्ण होणार आहे, ते म्हणजे बाप्पाच्या आगमनाने. ‘इट्स मज्जा’ लवकरच ‘आठवी-अ’च्या कलाकारांबरोबरचं गणपती स्पेशल खास गाणं घेऊन येणार आहे.
इट्स मज्जा ओरिजिनल व मीडिया वन सोल्यूशन्सने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हमी घेतली आणि हीच हमी ‘इट्स मज्जा’ आगामी गणपती स्पेशल गाण्यातून पूर्ण करणार आहे. ‘इट्स मज्जा’ लवकरच प्रेक्षकांसाठी गणपती विशेष गाणं ‘बाप्पा आमचा आला’ हे गाणं घेऊन येत आहे. यंदाचा गणशोत्सव खास करण्यासाठी मीडिया वन सोल्यूशन्स व इट्स मज्जा घेऊन येत आहे ‘बाप्पा आमचा आला’ हे गणपती स्पेशल गाणं. येत्या २७ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “ती माझ्या पायाखाली”, इरिनावरुन झालेल्या भांडणात वैभवचा राग अनावर, टीम A मध्ये ताटातूट?
दरम्यान, ‘बाप्पा आमचा आला’ हे गाणं ओमकार कानिटकर व आंचल ठाकूर यांनी गायलं आहे. तर या गाण्याचे शब्दांकन समीर पठाण यांनी केलं आहे. तर सुमधुर भक्तीगीताला सुरेल चाल देण्याचे काम मंदार पाटील यांनी केलं आहे. संपूर्ण गाण्याच्या दिग्दर्शनाची धुरा नितीन वाडेवाले यांनी सांभाळली असून नृत्य दिग्दर्शन संतोष भांगरे यांनी केले आहे. त्याचबरोबर ‘बाप्पा आमचा आला’ या भक्तीगीताच्या निर्मितीची जबाबदारी शौरीन दत्ता यांनी पार पाडली आहे. तर प्रोजेक्ट हेड म्हणून या गाण्याची जबाबदारी अंकिता लोखंडे यांनी उत्तमरीत्या संभाळली आहे. ‘आठवी-अ’च्या कलाकारांनी गाण्यात केलेली धमाल मजामस्ती पाहणं औत्स्युक्याची ठरतेय.