बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्या सतत चर्चेत असलेली पाहायला मिळत आहे. नुकतीच तिला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट केले गेले. ती भारतात आल्यानंतर विविध चर्चादेखील सुरू झाल्या. मात्र आता त्याचे कारण समोर आले आहे. प्रियाका तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या लग्नासाठी भारतात आल्याचे समोर आले. नुकतेच सिद्धार्थच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पहायाल मिळत आहेत. यामध्ये सगळी चर्चा तिच्या लूकची झाली. त्यामुळे आता सर्वत्र तिच्या स्टनिंग लूकची खूप चर्चा रंगली आहे. तसेच तिचे फोटोदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (Priyanka chopra look)
सिद्धार्थचया लग्नामध्ये प्रियांकाने साडी नेसली होती. मजेंटा रंगाच्या साडीने सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले. तिचा हा लूक पाहून सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. तिने साडीबरोबर स्ट्रिप असणारा स्लीवलेस ब्लाऊज घातला होता. तसेच गळ्यामध्ये तिने मोत्याचा नेकलेसदेखील घातला होता. तसेच कानातलेदेखील तशाच प्रकारचे होते. तिचा हा संपूर्ण शाही लूक वाटत होता. त्याचप्रमाणे केसांचादेखील लुज बन बांधला होता. त्यावर लाल रंगाची लिपस्टिक यामुळे तिच्या सौंदर्यात खूपच भर पडली होती.
या सोहळ्यादरम्यानचे काही फोटोदेखील व्हायरल झाले आहेत. यामध्ये तिची आई मधू चोप्रा व इतर नातेवाईक व पाहुणेदेखील दिसून येत आहेत. एका फॅनपेजने देखील फोटों शेअर केले आहेत. त्यामध्ये एक व्हिडिओ शेयर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “सर्वांना खूप शुभेच्छा. सिद्धार्थ व निलम यांना पती-पत्नीच्या रुपात बघायला आवडलं. तुम्हाला जगातील सर्व सुखं मिळो. देव नेहमी तुमच्या बरोबर आहे”.
दरम्यान प्रियांकाच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान सध्या तिच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर लवकरच ती मराठी चित्रपट ‘पाणी’ या चित्रपटाची निर्माती म्हणून समोर येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदिनाथ कोठारे करणार आहे.