बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट लवकरच जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. मात्र, त्याआधी या चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला शाहरुखच्या चाहत्यांसह चित्रपटप्रेमींनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. सोशल मीडियावर ‘जवान’च्या ट्रेलरने धुमाकूळ घातल्यानंतर काही तासांतच तो जगातील सर्वात उंच इमारत दुबईच्या बुर्ज खलिफा येथे प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलर लाँच सोहळ्यावेळी शाहरुखच्या असंख्य चाहत्यांना मोठा आनंद झाला होता. (Jawan Trailer Burj Khalifa Dubai)
चेन्नईतील प्री-रिलीज इव्हेंटनंतर शाहरुखने दुबईतील २० हजारांहून अधिक चाहत्यांच्या उपस्थितीत ‘जवान’चा ट्रेलर रिलीज केला. यावेळी शाहरुखसह चित्रपटाचा दिग्दर्शक अटली व संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध यांनी हजेरी लावली होती.
बुर्ज खलिफावर शाहरुख खान व ‘जवान’चा दमदार ट्रेलर पाहून चाहत्यांनी एकच जल्लोष केला होता. याबरोबरच चित्रपटातील ‘चलेया’ गाण्याचे अरेबिक व्हर्जनही प्रदर्शित करण्यात आले. यावेळी शाहरुखने जवानच्या ‘चलेया’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला.
हे देखील वाचा – ‘केबीसी १५’ चा पहिला करोडपती ठरला पंजाबचा २१ वर्षीय युवा, जिंकेल का ७ करोड?
हे देखील वाचा – Jawan Trailer : “बेटे को हाथ लगाने से पहले…”, ‘जवान’मधील शाहरुखचा हा डायलॉग, अन् ‘या’ रिअल लाईफ अधिकाऱ्याची सोशल मीडियावर होत आहे चर्चा
शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात अभिनेत्री नयनतारा, विजय सेतुपती, सुनील ग्रोव्हर, प्रियमणी, गिरीजा ओक व अन्य कलाकारही झळकणार आहे. त्याचबरोबर अभिनेत्री दीपिका पदुकोण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. ७ सप्टेंबरला हा चित्रपट हिंदीसह प्रादेशिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. आता ‘पठाण’प्रमाणे शाहरुखचा ‘जवान’ बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Jawan Trailer Burj Khalifa Dubai)