शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“खुशीच्या रुममधून रडण्याचा आवाज आला अन्…”, जान्हवी कपूरने सांगितला आईच्या मृत्यूनंतरचा ‘तो’ भयानक प्रसंग, म्हणाली, “तिला रडताना…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 4, 2024 | 3:29 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
janhvi and khushi kapoor got emotional over the death of their mother sridevi in koffee with karan show

"खुशीच्या रुममधून रडण्याचा आवाज आला अन्…", जान्हवी कपूरने सांगितला आईच्या मृत्यूनंतरचा 'तो' भयानक प्रसंग, म्हणाली, "तिला रडताना…"

करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा लोकप्रिय कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो. अशातच या कार्यक्रमाचा आठवा सीजन सुरु झाल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांमुळे तसेच या कलाकारांच्या विविध वक्तव्यांमुळे हा कार्यक्रम नेहमीच खास ठरतो.  या शोमध्ये आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेकांनी हजेरी लावली आहे. या शोच्या आगामी भागात कपूर सिस्टर्स हजेरी लावणार आहेत. (Janhvi And Khushi Kapoor Got Emotional Of Their Mother Sridevi)

करण जोहरच्या शोच्या आगामी भागामध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर व खुशी कपूर या दिसणार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका प्रोमोमध्ये या दोघी बहिणी एकमेकांबरोबर गंमत करताना दिसून आल्या. यावेळी त्यांनी एकमेकांवर विनोद करत व एकमेकांची मस्करी केली. त्याचबरोबर आई श्रीदेवीच्या आठवणीत भावुक झाल्याचेही पाहायला मिळाले. आईच्या मृत्यूबद्दल कळताच त्यावेळी जान्हवीची काय प्रतिक्रिया होती याबद्दल तिने  सांगितले.

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

आणखी वाचा – माधुरी दीक्षित समोर असताना तेजश्री प्रधानच्याच ड्रेसची रंगली सर्वाधिक चर्चा, म्हणाली, “आज पहिल्यांदाच भेटले अन्…”

याबद्दल जान्हवी असं म्हणाली की, “जेव्हा आईच्या निधनाबद्दलचा मला फोन आला तेव्हा मी माझ्या खोलीत होते आणि मला खुशीच्या खोलीतून रडण्याचा आवाज येत होता. मी रडत रडत तिच्या खोलीत धावत गेले. तेव्हा खुशीने माझ्याकडे पाहताच क्षणी तिने तिचे रडणे थांबवले आणि ती माझ्याशेजारी येऊन बसली. मला शांत करू लागली आणि तेव्हापासून मी तिला कधीही रडताना पाहिले नाही.”

आणखी वाचा – लग्नाच्या दोन महिन्यांमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री गरोदर, बेबी बम्प दाखवत फोटो केला शेअर, म्हणाली, “आता आम्ही…”

खुशी व जान्हवी दोघे बहिणी त्यांच्या आईच्या आठवणीत भावुक झाल्या असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, श्रीदेवी यांच्या निधनाची बातमीने अवघ्या देशासह बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसला होता. अभिनेत्रीच्या निधनानंतर जान्हवी-खुशीसह त्यांची सावत्र भावंडे अर्जुन व अंशुला कपूर यांच्याशी जवळीक वाढली.

Tags: bollywood newsentertainment newsjanhvi kapoorkofee with karan 8
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Vanita Kharat Workout

Video : वजन कमी करत आहे वनिता खरात, वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आता थांबून…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.