माझी तुझी रेशीमगाठ ही झी मराठीवरील मालिका आजही चाहत्यांची आवडती मालिका आहे. काही महिन्यांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत आपल्याला बॉलिवूडचा मराठमोळा चेहरा श्रेयस तळपदे पाहायला मिळाला होता.. श्रेयसने मालिकेतून बऱ्याच वर्षानंतर मालिका क्षेत्रात पाऊल ठेवले. आई मुलीची नात्याची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आली होती.
अभिनेत्री प्रार्थना बेहरे पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेत दिसली असून तिची भूमिका आणि मालिकेतील नेहा-यशाच्या केमिस्ट्रीने तर चाहत्यांना वेड लावलं. म्हणून प्रेक्षकांनी या मालिकेतील प्रत्येक पात्रांना भरभरून प्रेम दिलं.तर प्रेक्षक आजही या मालिकेला विसरले नाहीत.चाहत्यांनी पुन्हा ही मालिका सुरु करा अशी मागणी केली आहे. या संबंधितच एक नवा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(Mazi Tuzi Reshimgath)
हे देखील वाचा – अखेर रत्नमालाचा पलटवार! वैदेही सानियाला शिकवला धडा
नुकतंच झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ‘दार उघड बये’ या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला होता. दार उघड बये ही मालिका सध्या झीवर प्रसारित होत असली तरीही माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेची चर्चा सर्वत्र पाहायला मिळते. प्रसारित झालेल्या प्रोमोवर प्रेक्षकांनी ‘दार उघड बये’विषयी कमी पण ‘माझी तुझी रेशीमगाठ’विषयी जास्त भाष्य केले. प्रेक्षकांनी कमेंट करत ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सुरू करण्याची मागणी केली.(Mazi Tuzi Reshimgath)
दार उघड बये ही मालिका सध्या सायंकाळी 8:30 वाजता प्रसारित होते. या मालिकेच्या वेळेत आधी माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका प्रसारित होत होती. यामुळे या मालिकेच्या प्रोमोवर अनेक चाहत्यांनी #wewantmazituzireshimgaathback अश्या हॅशटॅगसह ही मालिका पुन्हा सुरु करा अशी मागणी केली आहे.चाहत्यांनी दार उघड बये या मालिकेच्या प्रोमोवर “आम्ही mtr2 ची वाट पाहत आहोत.,माझी तुझी रेशीम गाठ ही मालिका पुन्हा प्रसारीत करा, नेयश म्हणजे आमच्या नेहा आणि यशाची जोडी पुन्हा आणा.” अश्या अनेक कमेंटचा वर्षाव केला आहे. तर आता माझी तुझी रेशीम गाठ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार का हे पाहणं उत्सुकतेचं असेल.
