कलर्स मराठी वरील भाग्य दिले तू मला ही प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. नुकतेच या मालिकेने ३०० भाग पूर्ण केले आहेत. कोणत्या ही मालिकेचे कथानक पुढे जाण्यामध्ये खलनायकांचा मोठा वाट असतो.आणि या खलनायिकांमध्ये सध्या गाजत असलेली खलनायिका सानिया, म्हणजेच अभिनेत्री जान्हवी किल्लेकर. जान्हवीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण केले आहे.(Jahnavi Killekar)
मालिकेतील तिच्या कामा बदल पात्रा बदल ती कायम चर्चेत असते त्याच सोबत तिच्या सोशलमीडिया वरून ही बरेच फोटोज ऑफस्क्रीन व्हिडिओज, रिल्स, शेअर करून ती प्रेक्षकांच्या नजरेत राहते.परंतु या सगळ्या सोबतच कलाकरांना त्यांच्या फिटनेसची देखील विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे तिच्या बिझी शेड्युल मधून वेळ काढून जान्हवी तिच्या फिटनेसकडे लक्ष देते. सध्या जान्हवी तिच्या इंस्टग्राम अकाउंट वरून बरेच जिम चे व्हिडिओ शेअर करताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी जान्हवीने जिम टाइम असे कॅप्शन देत तिचा जिम मधील व्हिडिओ शेअर केला होता. रात्री १० वाजताचा हा व्हिडिओ आहे. शूटिंग संपल्या नंतर ही कलाकार फिटनेस साठी वेळ राखून ठेवतात.
पहा का होतेय जान्हवी ट्रोल (Jahnavi Killekar)
त्यानंतर तिने आता खूप मनावर घेतलंय मी अस कॅप्शन देत तिचा वर्कआऊट करतानाचा नवीन रील शेअर केला आहे.यात ती तिच्या जिम ट्रेनर सोबत वर्कआऊट करताना पाहायला मिळतेय. तिच्या या रील वर प्रेक्षकांनी पसंती दर्शवत डंबेल्स कोण मारतंय ट्रेनर कि विद्यार्थी ?, तुमच्या पेक्षा जास्त त्या ट्रेनर ने मनावर घेतलंय, खूपच आता काही खरं नाही कावेरीचं अशा अनेक मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत.जान्हवी चा अंदाज प्रेक्षकांना आवडतोय परंतु त्या व्हिडिओ मध्ये तिच्या पेक्षा जास्त तिचा ट्रेनरच जास्त वर्कआऊट करतोय असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे.(Jahnavi Killekar)
हे देखील पहा : नक्की कावेरी करत काय होती?कावेरीचा मजेशीर व्हिडिओ पाहून प्रेक्षक म्हणाले…
कलाकारांना त्यांच्या भूमिकेच्या गरजेनुसार त्यांच्या शरीर रचनेत, वजनात बरेच बदल करावे लागतात. त्यांच्या पात्राला शोभतील असे अनेक बदल कलाकार करत असतात. कायिक भूमिकांसाठी वजन वाढवावे लागते तर काही भूमिकांसाठी कमी करावे लागते. त्या नंतर ते ते प्रोजेक्ट संपल्यावर पुन्हा त्यांच्या पूर्ववत स्थित त्यांना यावे लागते. आणि भूमिकेला पुरेपूर न्याय देण्यासाठी कलाकार ही तारेवरची कसरत करत असतात.