प्रेक्षकांच्या मनात कमी वेळात स्थान मिळवण्याचा मानखूप कमी मालिकांना मिळतो असाच मान मिळाला आहे कलर्स मराठी वाहिनी वरील भाग्य दिला तू मला या मालिकेला. मालिकेतील सारेच कलाकार प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप मिळवत आहे. मालिकेचं कथानक प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात यशस्वी ठरत आहे. भाग्य दिले तू मला या मालिकेत अभिनेता विवेक सांगळे आणि अभिनेत्री तन्वी मुंडले मुख्य भूमिकेत असून जेष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ देखील मुख्य भूमिकेत दिसतात.(Tanvi Mundle Funny Video)
या मुख्य कलाकारानं सोबतच जान्हवी किल्लेकर, अमित रेखी हे कलाकार देखील प्रेक्षकांच्या मनात घर करत आहेत. कलाकारांचे व स्क्रीन दिसणारे बॉण्ड आणि ऑफ स्क्रीन असणारी मैत्री फार वेगळी असते. ऑनस्क्रीन होणाऱ्या धमाल मस्तीसोबतच ऑफस्क्रीन घडणाऱ्या काही मजेशीर गोष्टी देखील ही कलाकार मंडळी नेहमी शेअर करत असतात. कावेरीचा म्हणजेच तन्वीचा असाच एक मजेशीर व्हिडिओ अमित ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे.
हे देखील वाचा – केसात गजरा,नाकात नथ,सईच्या फोटोंची चाहत्यांना भुरळ
अमित ने शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये कावेरी उशी सोबत खेळताना दिसत आहे तर या व्हिडिओ वर कमेंट्स करत प्रेक्षकांनी म्हणाले आहे की कावेरीला त्रास देण्याचा सानियाचा नवीन प्लॅन नाही ना त्याचीच तयारी कावेरी करत आहे का? , पीठ मळण्याची प्रॅक्टिस चालू आहे वाटत.. अशा अनेक मजेशीर कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत.(Tanvi Mundle Funny Video)
कावेरीच्या हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. प्रेक्षकांनी जेव्हा विचारलं नक्की काय करत होतीस तेव्हा त्यांच्या प्रश्नांवर ‘पुढच्या भागात सानिया कावेरीला मोठा कणकेचा गोळा बनवा;या सांगणार आहे त्याचीच तयारी सुरु आहे असं मजेशीर उत्तर दिल आहे. मालिकेचं कथानक सध्या योग्य वळणावर असून प्रेक्षकांच्या देखील चांगलंच पसंतीस पडत आहे.