Bigg Boss 17 Updates : टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय व चर्चेत राहणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. नुकताच ‘बिग बॉस’चे १७वे पर्व संपले असून मुनव्वर फारुकी हा पर्वाचा विजेता ठरला. मनारा चोप्रा, अरुण माशेट्टी, मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे व अभिषेक कुमार या ५ स्पर्धकांमध्ये ही अंतिम लढत झाली होती आणि यात मुनव्वरने बाजी मारत विजेतेपदावर त्याचे नाव कोरले आहे.
बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्याच्या अगदी नजीक जाताच या घरातील विकी जैनचा प्रवास संपला होता. घराबाहेर येताच विकी जैन त्याच्या पार्टीमुळे चांगलाच चर्चेत आला होता. पत्नी अंकिता बिग बॉसच्या घरात असताना विकी जैन एकटा काही मैत्रिणींबरोबर पार्टी करताना दिसला. या पार्टीच्या व्हायरल झालेल्या फोटोंमधून विकी एका मुलीबरोबर रोमॅन्टिक पोज देताना दिसला होता. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अंकिताच्या चाहत्यांनी त्यावर कमेंट करत त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
यावर आता ‘बिग बॉस’मधीलच स्पर्धक इशा मालवीयने तिची प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टंट बॉलीवूड’ला दिलेल्या एका मुलाखतीत ईशाने विक्की जैनच्या स्वभावाबद्दल, विशेषत: स्त्रियांबद्दलच्या त्याच्या वागणुकीबद्दल सांगितले. यावेळी ती असं म्हणाली की, “मी दोन दिवसांपूर्वी विकी भाईच्या घरी गेले होते. तेव्हा तिथे विक्की भाईची सासू म्हणजेच अंकिताची आई तिथे होती, तसेच त्याचे चुलत भाऊही तिथे होते. त्या पार्टीचा एक फोटो समोर आला ज्यामध्ये आम्ही सर्वांनी काळे कपडे घातले होते. तसेच त्यात आयेशा, मी, सना, विकी भाई आणि त्याचा चुलत भाऊ हे दिसत आहेत”
आणखी वाचा – अक्षय कुमारच्या लेकीला कुत्रा चावला अन्…; बायकोने सांगितला ‘तो’ थक्क करणारा प्रसंग, म्हणाली, “त्याने…”
या व्हायरल फोटोवरुन झालेल्या ट्रोलिंगबद्दल इशा असं म्हणाली की, “तो असं अजिबातच नाही. लोकं यावरुन त्यांना का ट्रोल करत आहेत, माहीत नाही, विकीचा तो स्वभावच आहे की लोकांना सुरक्षित करणे. ‘बिग बॉस’च्या घरातही त्याची मनाराबरोबरची मैत्री हे याचेच एक उदाहरण होते.”