सध्या राज्यभर सर्वत्र मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी महानगरपालिकेची काही कर्मचारी प्रत्येकाच्या घरी जाऊन जातीनिहाय सर्वेक्षण करत आहेत. यावर अभिनेत्री केतकी चितळेपाठोपाठ अभिनेता पुष्कर जोगनेही उद्धट वर्तन केले असल्याचे पहायला मिळाले. पुष्करने जातगणना करायला आलेली व्यक्ती ही जर बाई नसती तर मी त्या दोन लाथा घातल्या असत्या” असं म्हणत वादग्रस्त पोस्ट समाजमाध्यमांवर लिहिली होती. यावर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
पुष्करने लिहिलेल्या या पोस्टमुळे त्याला नेटकऱ्यांसह अनेक मराठी कलाकारांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. पुष्करने लिहिलेल्या या पोस्टवर अनेकांनी टीका करत त्याला चांगलेच धारेवर घटले आहे. नुकतीच अभिनेते किरण माने, संदेश उपशाम यांनी पुष्करच्या या कृतीचा निषेधार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. अशातच अभिनेता अभिजीत केळकरनेही फेसबुकवर पोस्ट शेअर करत पुष्करच्या या कृतीबद्दल त्याची नाराजी व्यक्त केली आहे. तसेच यानिमित्ताने त्याला काही प्रश्नदेखील विचारले आहेत.

आणखी वाचा – अक्षय कुमारच्या लेकीला कुत्रा चावला अन्…; बायकोने सांगितला ‘तो’ थक्क करणारा प्रसंग, म्हणाली, “त्याने…”
अभिजीतने लिहिलेलल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्समध्ये अभिजीतच्या या पोस्टला समर्थन दिले असून पुष्करच्या वर्तणूकीबद्दल टीका केली आहे. या पोस्टवर अभिनेते शरद पोंक्षे यांनीही कमेंट करत अभिजीतच्या पोस्टचे कौतुक समर्थन केले आहे. शरद पोंक्षे यांनी या पोस्टखाली कमेंट्समध्ये असे म्हटले आहे की, “माझ्या घरीसुद्धा नगरपालिकावाले आले होते. मी त्यांना चहापाणी विचारलं. मी ब्राम्हण आहे, मला कसलीच सवलत नको, म्हणून नोंदही नको असं नम्रपणे त्यांना सांगितलं. त्यावर तेही हसून निघून गेले.”
यापुढे शरद पोंक्षे यांनी कमेंटमध्ये असे म्हटले की, “दरवाजावर कुणीही आलं तरी त्याचा आदर करणं ही आपली संस्कृती आहे. आपल्याला नकारसुद्धा नम्रपणे देता आला पाहिजे.” दरम्यान, या पुष्करनच्या विधानामुळे झालेल्या गदारोळानंतर “मी केवळ माणूसकी हाच धर्म मानतो. बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून केलं गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो.” असं म्हणत माफीही मागितली. पण तरीदेखील अजूनही अनेक सोशल मीडिया माध्यमांवर त्याच्यावर संताप व्यक्त केला जात आहे.