देशभरात आत्महत्येची प्रकरणं वाढताना दिसत आहेत. युवापिढी नैराश्येच्या अधीन जाताना दिसत आहेत. अशीच एक बातमी सोशल मीडिया जगतातून समोर येत आहे. एका २८ वर्षीय इंस्टाग्राम इन्फ्लुएंसरने आत्महत्या केली आहे. या इन्फ्लुएंसरने पहिल्यांदा त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा फोटो शेअर करत त्यांच्या मृत्यूची पोस्ट शेअर करत श्रद्धांजली दिली. त्यानंतर त्याने स्वतःच्याच घरी स्वतःच जीवन संपवलं. या पोस्टने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सध्या ही बातमी सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. (Instagram influencer ajmal shareef kills himself)
आत्महत्या केलेल्या युवकाचं इन्स्टाग्राम इन्फ्लुंसरचं नाव अजमल शरीफ असं होतं. तो केरळमधील अलुवामध्ये राहणारा होता. शुक्रवारी संध्याकाळी ६.३०च्या सुमारास पंख्याला लटकून आत्महत्या केली. त्याअगोदर त्याने एक फोटो शेअर करत सगळ्यांना अवाक करणारं असं कॅप्शन लिहीलं होतं. कॅप्शनमध्ये त्याने लिहीलं होतं की, “मला खूप वाईट वाटत आहे. अजमल शरीफ या जगात राहिलेला नाही. देव त्याच्या आत्म्याला शांती देवो”, असं लिहीत त्याने स्वतःच्यात आत्म्याला शांती लाभावी यासाठी श्रद्धांजलीची पोस्ट लिहीली. जेव्हा त्याच्या आत्महत्येची बातमी जगासमोर आली तेव्हा ही पोस्ट सत्यात उतरली. त्याच्या अचानक जाण्याने घरच्यांच्या पाया खालची जमीनच सरकली. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा समोर आलं की अजमल नैराश्येचा सामना करत होता. त्यांच्या घराच्यांनी खुलासा केला की त्याला नोकरी मिळत नसल्यामुळे तो नेहमी तणावात असायचा.
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अजमलचा शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा शव त्याच्या घरच्यांकडे सुपुर्त करण्यात आला आहे. अजमलच्या इंन्स्टाग्रामबद्दल बोलायचं तर त्याचे सोशल मीडियावर १५ हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स होते. अजमलने जी शेवटची पोस्ट शेअर केली त्यात त्याने १९९५-२०२३ असं साल नोंद केलं होतं.
अजमलच्या आत्महत्येपूर्वी त्याने केलेल्या पोस्ट सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणारी होती. त्याच्या त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी बरेच कमेंट केले आहेत. काहीनी त्याच्या या निर्णयाची निंदा केली आहे. तर काहींनी त्याच्या या पोस्टवर दुःखही व्यक्त केलं आहे. काहींनी असंही म्हटलं आहे की कोणाचीही चेष्ठा करु नये कारण त्याची मानसिक स्थिती ठीक नसावी, अशा प्रकारच्या कमेंट नेटकऱ्यांना त्याच्या पोस्टवर केल्या आहेत.