बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सनी देओल बेपत्ता?, सगळीकडे पोस्टरही लागले, शोधून काढणाऱ्याला मिळणार ५० हजार रुपयांचे बक्षीस, नेमकं प्रकरण काय?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 11, 2023 | 4:01 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sunny Deol Missing Posters

सनी देओल बेपत्ता?, सगळीकडे पोस्टरही लागले, शोधून काढणाऱ्याला मिळणार ५० हजार रुपयांचे बक्षीस, नेमकं प्रकरण काय?

पठाणकोटच्या हल्का भोया येथील स्थानिक लोकांनी सरना बसस्थानकात ठिकठिकाणी बेपत्ता खासदार सनी देओलचे पोस्टर लावून संताप व्यक्त केला. जिल्ह्यात बेपत्ता खासदाराचे पोस्टर लावण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही जिल्ह्यातील पठाणकोट, सुजानपूर भागात बेपत्ता खासदार सनी देओलचे पोस्टर लावण्यात आले होते, मात्र खासदारांनी एकदाही लोकांच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही असा आरोप तेथील जनतेने केला आहे. (Sunny Deol Missing Posters)

गावाच्या दुरवस्थेचा आवाज कुठेतरी खासदारापर्यंत पोहोचावा यासाठी रविवारी बेपत्ता खासदाराचे पोस्टर बसमधून प्रवास करणाऱ्या लोकांना देण्यात आले आणि बसेसवर चिकटवण्यात आले. सनी देओल जेव्हापासून गुरुदासपूर व पठाणकोट जिल्ह्यांचा खासदार झाला, तेव्हापासून तो दोन्ही जिल्ह्यात दिसला नाही किंवा त्याच्या वतीने कोणतेही विकासकाम केले गेले नाही, असा संताप स्थानिक जनतेने व्यक्त केला.

आणखी वाचा – सनी देओल बेपत्ता?, सगळीकडे पोस्टरही लागले, शोधून काढणाऱ्याला मिळणार ५० हजार रुपयांचे बक्षीस, नेमकं प्रकरण काय?

सनी देओल यांचा विरोध करणाऱ्या जनतेचा आरोप आहे की, “खासदार झाल्यापासून सनी देओल यांनी कधीही त्यांच्या मतदारसंघात भेट दिली नाही. त्यांनी कोणतीही विकास कामे केली नाहीत. २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत अशा लोकांना कोणत्याही पक्षाने तिकीट देऊ नये, कारण सनी देओल लोकांना मूर्ख बनवून विजयी झाला आहे”, असे लोक म्हणाले. तर काही आंदोलकांनी, “जर कोणी खासदार सनी देओलला शोधून आणले तर त्याला ५० हजार रुपयांचे बक्षीस देऊ” असेही सांगितले.

आणखी वाचा – ‘लूट पुट गया’नंतर ‘डंकी’च्या दुसऱ्या गाण्याची चर्चा, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुख खानने सांगितला चित्रपटाच्या नावाचा अर्थ

बॉलिवूड अभिनेते सनी देओल याचे अनेक चाहते आहेत. ‘गदर २’ चित्रपटानंतर सनी देओल यांची क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळाली. त्यांच्या आगामी अनेक सिनेमांची चर्चा असताना पंजाबमध्ये ते बेपत्ता असल्याचं पोस्टर लावण्यात आल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Tags: bollywood actorsunny deolsunny deol missingSunny Deol Missing Posters
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
marathi actor anshuman vichare shared video of auto driver and say thank you who returned his phone

Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा महागडा फोन हरवला, रिक्षावाल्याला मिळताच केला परत, व्हिडीओ शेअर करत केलं कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.