बॉलिवूडमधील क्युट कपल्सच्या यादीत नेहमी ज्यांचं नाव घेतलं जातं ते कपल म्हणजे देशमुख कपल. अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलीया देशमुख नेहमीच त्यांच्या गोड केमिस्ट्रीमुळे चर्चेत असतात. तसंच हे जोडपं त्यांच्या मुलांमुळे बरंच चर्चेत असतं. ते त्यांच्या मुलांबरोबरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. त्यांचे फोटो चाहत्यांनाही बरेच पसंतीस पडतात. त्यांच्या मुलांची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगताना दिसते. विशेष म्हणजे त्यांच्या लेकांची हेअर स्टाईल हे नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय असतो. नुकताच जिनिलीयाने एक खास व्हिडीओ शेअर करत त्यांच्या लेकांचा हेअर स्टाईलिस्ट कोण आहे याचा खुलासा केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (riteish deshmukh trim hairs of his son)
जिनिलीया नेहमीच त्यांच्या मुलांचे खास क्षण शेअर करताना दिसते. आताही तिने शेअर केलेल्या व्हिडीओत रितेश त्यांच्या लहान लेकाचे केस कापताना दिसत आहे. हा खास व्हिडीओ शेअर करत जिनिलीयाने लिहीते की, “जेव्हा मुलगा हट्ट करतो की त्याच्या वडिलांनीच त्याचे केस कापावे तेव्हा वडिलांना त्याचे केस कापावे लागतात. सगळ्या मुलांना त्यांच्या वडिलांचा मौल्यवान वेळ हवा असतो. तुम्ही त्यांना कोणतीही महाग भेटवस्तू द्या पण त्यांना तुमचा वेळ अधिक महत्त्वाचा असतो”, असं लिहीत जिनिलीयाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. जिनिलीयाने हा व्हिडीओ शेअर करत प्रत्येक पालकांना हटके अंदाजात सल्ला दिला आहे.
रितेश-जिनिलीया बऱ्याचदा त्यांच्या कामातून मुलांसाठी वेळ काढताना दिसतात. जिनिलीयानेही त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी कित्येक वर्षे सिनेसृष्टीतून ब्रेकही घेतला होता. या काळात त्यांनी त्यांच्या मुलांच्या संगोपनाकडे विशेष लक्ष दिला आहे. त्यामुळे प्रत्येक व्हिडीओत रितेश-जिनिलीयाच्या मुलांवर झालेले संस्कार पाहायला मिळतात आणि त्यांचं नेटकऱ्यांकडून कौतुकही होत असतं. पालक म्हणून या दोघांवरही नेटकऱ्यांचा बऱ्याचदा कौतुकाचा वर्षाव होत असतो.
या अगोदर जिनिलीया त्यांच्या मोठ्या मुलाच्या फुलबॉल मॅचला गेली होती. त्याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यात ती लेकाला प्रोत्साहन देताना दिसत होती. तसेच जिनिलीयाच्या गैरहजेरीत रितेश मुलांच्या प्रत्येक गोष्टींकडे कस लक्ष देतो याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता. आताही रितेशचा हा व्हिडीओतील अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.