सध्या भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या अधिक चर्चेत आला आहे. भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. त्याच्या खेळाची जगभरात चर्चा होतेच मात्र सध्या तो खासगी आयुष्यामुळे अधिक प्रकाशझोतात आला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक बरोबर घटस्फोट घेणार असल्याचे बोलले जात होते. मात्र खूप काळ दोघांनीही यावर कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नव्हते. मात्र काही दिवसांपूर्वी स्वतः हार्दिकने नताशापासून वेगळे होणार असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते. काही दिवसांनंतर त्यांनी वेगळे होणार असल्याची घोषणादेखील केली. त्यानंतर हार्दिकचे नाव काही अभिनेत्रीबरोबर जोडण्यात आले. (jasmin walia and hardik pandya dating)
काही दिवसांपूर्वीच हार्दिक अभिनेत्री जॅस्मिन वालियाला डेट करत असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. हार्दिकने ग्रीस येथे सुट्टीला गेला असताना काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याने शेअर केलेले फोटो व जॅस्मिनने शेअर केलेले फोटो हे सारख्याच ठिकाणचे असलेले दिसून आले. त्यामुळे दोघांच्याही चाहत्यांनी ते एकत्र असल्याचे अनेक अंदाज बांधले. मात्र या सगळ्या प्रकारावर दोघांनीही कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नाही.
मात्र आता रेडिटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये जॅस्मिनने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या बाजूला एक व्यक्ती बसली असून हातावर टॅटू काढलेला दिसत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक अंदाज बांधले आहेत. यामध्ये तो हात हार्दिकचा असल्याचे अनेकांनी म्हंटले आहे. पण हा हात हार्दिकचाच आहे अशी कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.
दरम्यान घटस्फोटाच्या निर्णयानंतर नताशा मुलगा अगस्त्यला घेऊन मायदेशी परतली. नताशा व हार्दिकने २०२० साली हिंदू व ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. २०२३ रोजी त्यांनी पुन्हा एकदा लग्न केले. मात्र अंतर्गत मतभेदामुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. जुलै महिन्यात दोघांनी वेगळे होणार असल्याची घोषणा सोशल मीडियाच्या मध्यमातून केली होती.