शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आधी मुली आता ८५ वर्षांच्या आजीवरही बलात्कार, भयावह दृश्य पाहून अभिनेत्रींमध्ये संताप, अनुष्का शर्मा म्हणाली, “पुरुष तर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 17, 2024 | 11:25 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Anushka Sharma on rape cases

अनुष्का शर्माने कोलकाता बलात्कार प्रकरणावर व्यक्त केला संताप

बॉलिवूडमधील अनुष्का शर्मा ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिच्या सगळ्याच भूमिकांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळालं आहे. मात्र पहिल्या मुलीच्या जन्मानंतर अनुष्का मनोरंजन विश्वापासून दूर झालेली पाहायला मिळते. पण सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती मनातील अनेक विचार सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. सध्या देशात सर्वत्र कोलकातामध्ये घडलेल्या बलात्कार व हत्येसंदर्भात संतापजनक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनीदेखील या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे. यामध्ये अनुष्काच्या सोशल मीडियावरील पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. (Anushka Sharma on rape cases)

अनुष्का अनेकदा जगभरात घडणाऱ्या अनेक घटनांवर खुलेपणाने भाष्य करताना दिसते. नुकतीच तिने कोलकातामध्ये शिकाऊ डॉक्टरवर बलात्कार व हत्येची घटना घडली त्याला आता सडेतोड उत्तर दिले आहे. अनुष्काने भारतात घडलेल्या बलात्कार संबंधित घटनांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हायरल पोस्ट शेअर केली आहे. यांमध्यूए आजवर बलात्कारासारखे गंभीर प्रकारावर भाष्य करताना दिसत आहे. या लिस्टमध्ये केवळ कोलकाता येथील बलात्कार व हत्येचा सहभाग नसून इतर वयोगटातील महिलांबरोबर काय घडलं आहे? हे दाखवण्यात आले आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातील इतर सदस्यांना हरवून अरबाज पटेल झाला नवीन कॅप्टन, मात्र कौतुक सूरज चव्हाणचं

अनुष्काने जी लिस्ट शेअर केली आहे त्यामध्ये दिल्लीतील दोन वर्षांच्या मुलीपासून उत्तर प्रदेशमधील 85 वर्षीय महिलेवर झालेल्या अत्याचारांच्या घटनांचा समावेश आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर सुमारे ३.७ मिलियनपेक्षा अधिक वेळा शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिने लिहिले की, “अजूनही तिचीच चूक आहे का?”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : अरबाजने सूरजला लाथेने उडवलं, अंगावर धावून गेला, हाणामारी केली अन्…; खेळासाठी राक्षसी वृत्ती

पुढे तिने विचारले की, “यावेळी कोणतं कारण आहे? की यावेळी देखील तिची चूक आहे. कारण पुरुष तर पुरुषच राहणार आहे”. अनुष्काच्या या पोस्टवरुन महिलांच्या बाजूने उभी राहणारी ती महिला असल्याचे दिसून येत आहे. करीना कपूरपासून आलिया भट्ट, हृतिक रोशन तसेच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश आहे. या सगळ्यांनी सोशल मीडियावर आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान अनुष्काच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, अनुष्काने विराटबरोबर लग्न केले. सध्या ती तिच्या कुटुंबासमवेत लंडनमध्ये स्थायिक झाली आहे. लवकरच तिचा महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित ‘छाकडा एक्सप्रेस’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

Tags: anushka sharmakolkata rape casesocial media
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Uttarakhand Nurse Rape marathi actor Siddharth Chandekar expressed his anger know more

Uttarakhand Nurse Rape : "चेहरे झाकायचे का? त्यांचा जीव घ्या", उत्तराखंडमध्ये नर्स बलात्कार प्रकरणी भडकला मराठी अभिनेता, म्हणाला, "पुन्हा एकदा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.