Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding in Jamnagar : उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट हे दोघेही जुलैमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या दोघांच्याही लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरवात झाली आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातून दिग्गजांनी हजेरी लावली आहे. हॉलिवूड पॉप सिंगर रिहानादेखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होती. तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमामध्ये रिहानाने पहिल्या दिवशी गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. तिच्या या कार्यक्रमाला उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळाली. तिचे गाण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अनंत व राधिकाच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी रिहानाने तिची गाजलेली गाणी सादर केली. या कार्यक्रमासाठी अंबानी कुटुंबाने तिला ५२ कोटी रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे. पण रिहानाने अंबानी कुटुंबियांचे आभार मानले आहेत आणि अनंत व राधिकाला शुभेच्छा दिल्या. पण परफॉर्मन्स सादर केल्यानंतर रिहाना ही नीता अंबानीसह डान्स करत होती तेव्हा तिचा ड्रेस फाटला. तरीही ती डान्स करायची थांबली नाही. ती सर्व मस्त एंजॉय करत होती. हा प्रकार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे.
या दरम्यान तिच्याकडून एक चूक झाली. परफॉर्मन्स सादर करताना रिहाना अंबानी कुटुंबातील धाकट्या सूनेचं नाव योग्य प्रकारे घेऊ शकली नाही. परफॉर्मन्सच्या दरम्यान तिने राधिका व अनंतला लग्नासाठी शुभेच्छा देत होती. तसेच भारतामध्ये बोलावल्याबद्दलही तिने अंबानी कुटुंबाचे आभार मानले. यादरम्यान तिने राधिकाचे नाव चुकीचे घेतले. राधिकाऐवजी तिने ‘रादिकी’ असे उच्चारले. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.
या व्हिडीओमध्ये ती म्हणाली की, “मी इथे असणे हे माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. मी त्यासाठी अंबानी कुटुंबाचे आभार मानते. मी आतापर्यंत भारतात कधीही आले नव्हते. अनंत व रादिकी मला इथे घेऊन आले, त्यासाठी धन्यवाद!”, यावर नेटकाऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीजण म्हणत आहेत की, “मुकेश अंबानी यांनी रिहानासाठी ५२ कोटी रुपये खर्च केले पण ती अंबानींच्या सुनेचं नावच व्यवस्थित घेऊ शकली नाही”, एका नेटकाऱ्याने , “तिच्या बोलण्याची पद्धतच तशी असावी म्हणून चुकली असेल”, असे म्हणत रिहानाला पाठिंबा दिला आहे.