कोणत्या मुलीला चांगलं दिसायला आवडत नाही? जेव्हा मुलीला समज येते तेव्हापासून प्रत्येक मुलगी ही आपल्या आईच्या कपाटातील मेकअपचे सामान घेऊन स्वतःच्या चेहऱ्यावर लावत असते. त्यामध्ये लिपस्टिक, काजळ,पावडर ते अगदी हातापायाला लावल्या जाणाऱ्या नेलपॉलिशचा त्यात समावेश असतो. नेलपॉलिश लावताना मुली ते आपल्या ड्रेसला मॅचिंग होणाऱ्या नेलपॉलिशचा वापर करतात. नेलपॉलिशचा वापर करणे खूप सोपे आहे पण ते बनवणे खूपच कठीण आहे. ही प्रक्रिया सोपी नसून त्यामध्ये अत्यंत बारकाईचे काम आहे. जाणून घेऊया नेलपॉलिश बनवण्याची प्रक्रिया. (making of nailpaint )
या व्हिडीओमध्ये आपण नेलपॉलिश बनवण्याची प्रक्रिया पाहायला मिळत आहे. ते एका बदलीमध्ये टाकले जाते आणि त्यानंतर मशीनद्वारे एकत्रित केले जाते. त्यानंतर त्यामध्ये एक केमिकल टाकले जाते आणि नंतर छोट्या काचेच्या बॉटलमध्ये भरले जाते. ही बॉटल पूर्ण बंद करुन त्यावर झाकण लाऊन पॅक केले जाते.
नेलपेंटमध्ये पॉलिमर,निट्रयुसेल्युलोस या केमिकलचा वापर करण्यात येतो. तसेच यामध्ये फॉर्मल्डिहाइड, कापूर, फॉर्मल्डिहाइड रेजिन, डिब्युटाइल फॅथलेट आणि टोल्युइन याकेमिकलचा देखील वापर करण्यात येतो. या केमिकलना ‘बिग फाइव्ह’ रसायने म्हणूनही संबोधले जाते. ज्यांची नखे नाजून आहेत त्यांच्यासाठी ही केमिकल अतिशय घातक मानली जातात.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरुन अभिषेक या युजरने नेलपॉलिश फॅक्टरीच्या आत जाऊन सर्व प्रक्रिया रेकॉर्ड केली असून तो व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. त्याने नेलपॉलिश बनवण्याची सर्व प्रक्रिया दाखवली असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ १.५ कोटी लोकांनी पाहिला आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, “या जागेमध्ये नेलपेंटचा खूप सुगंध दरवळत असेल”. तसेच दुसरा नेटकरी म्हणाला की, “पहिल्यांदाच नेलपेंटची बॉटल रिकामी झालेली पाहिली आहे”.