Bollywood Actor Saif Ali Khan Attacked At Home : सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. रात्री २ च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर, त्याने सैफ अली खानच्या घरातील नोकर आणि खुद्द अभिनेत्याशी भांडण केले. या हाणामारीत अभिनेता जखमी झाला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. उपचारासाठी अभिनेता सध्या लीलावती रुग्णालयात दाखल आहे. या रुग्णालयाचे सीईओ डॉ. नीरज उत्मानी यांनी सांगितले की, सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी अज्ञात व्यक्तीने चाकूने वार केले. त्याला पहाटे ३:३० वाजता रुग्णालयात आणण्यात आले.
उत्तमानी म्हणाले की, सैफवर सहा जखमा होत्या आणि दोन खोल जखमा होत्या. यापैकी एक पाठीच्या कण्याजवळ आहे. न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन डॉ. लीना जैन, भूलतज्ज्ञ डॉ. निशा गांधी, डॉ. उत्तममणी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर शस्त्रक्रिया करत आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, पोलिस सूत्रांनी सांगितले की, पहाटे २ वाजता एक अज्ञात व्यक्ती सैफ अली खानच्या घरात घुसली. सैफ आणि त्या अज्ञात व्यक्तीमध्ये हाणामारी झाली. सैफवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. सैफच्या मानेवर १० सेमीचा घाव आहे. सैफच्या हाताला आणि पाठीलाही दुखापत झाली आहे. सैफ अली खानची शस्त्रक्रिया तब्बल अडीच तास चालली.
सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा करीना कपूर घरी होती. तिने स्वतः सैफ अली खानला रुग्णालयात नेले. करिश्मा कपूर रात्री उशिरा आली.ती ४.३० पर्यंत हॉस्पिटलमध्ये आली होती. ऑपरेशनसाठी नेल्यानंतर, मुले घरी एकटी असल्याने करीना घरी परतली. सैफची बहीण सोहा आणि तिचा नवराही रुग्णालयात पोहोचले. पोलिसांनी सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तिघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात नेले आहे जिथे त्यांची चौकशी केली जाईल.
आणखी वाचा – धक्कादायक! सैफ अली खानवर चाकू हल्ला, घरात घुसून ज्ञातांकडून अनेकदा वार, रुग्णालयात उपचार सुरु
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. सैफच्या मानेवर १० सेमीचा घाव आहे. सैफच्या हाताला आणि पाठीलाही दुखापत झाली आहे.